• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • 'आता पुन्हा जुनी जर्सी परिधान करण्याची वेळ' Wasim Jaffer असे का म्हणाला?

'आता पुन्हा जुनी जर्सी परिधान करण्याची वेळ' Wasim Jaffer असे का म्हणाला?

jersey

jersey

माजी सलामीवीर वसीम जाफरने (Wasim jaffer) 90 च्या दशकातील पिवळ्या रंगाची जर्सीचा फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केला.

 • Share this:
  नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर : माजी सलामीवीर वसीम जाफरने (Wasim jaffer) 90 च्या दशकातील पिवळ्या रंगाची जर्सीचा फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केला. इतकेच नव्हे तर जुनी जर्सी (time to bring this jersey back? ) पुन्हा परिधान करण्याची वेळ आली आहे. असे जाफरने कॅप्शनमध्येही म्हटले आहे. अचानक असा फोटो शेअर केल्यामुळे युजर्संना अनेक प्रश्न पडले. जाफरने मास्टार ब्लास्टर सचिन तेंडुलरचा पिवळ्या रंगातील जर्सीचा फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. 1990 मधील हे टीम इंडियाचे किट आहे. हा फोटो शेअर करताना, त्याने पिवळ्या जर्सी पुन्हा आणावी असे म्हटले आहे.

  तर त्याचे असे आहे कारण?

  सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या फायनलमध्ये (Sayed Mushtaq Ali Trophy Final) तामिळनाडूने कर्नाटकवर (Tamil Nadu vs Karnataka) रोमांचक विजय मिळवला आहे. तत्पूर्वी, यंदाच्या टी 20 वर्ल्डकपवर ऑस्ट्रेलियाने आपले नाव कोरले. तसेच, मागच्या महिन्यात खेळवण्यात आलेली यंदाची आयपीएल ट्रॉफी चेन्नई सुपर किंग्जने जिंकली. चषक जिंकणाऱ्या या सर्व संघाची जर्सी पिवळ्या रंगाची होती. जाफरने याच पार्श्वभूमिवर हे ट्विट केले आहे. जाफरने सोशल मीडियावर शेअर केलेला सचिन तेंडुलकरचा फोटो 1994 च्या विल्स ट्रॉफीमधील आहे. या स्पर्धेत भारताशिवाय तत्कालीन विश्वविजेता पाकिस्तान, यजमान श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाचा संघही सहभागी झाला होता. या स्पर्धेत सचिनने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधील पहिले शतक झळकावले आणि तेही त्याच्या आवडता विरोधी संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध.
  Published by:Dhanshri Otari
  First published: