मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Ravi Shastri होणार आयपीएलमधील नव्या संघाचे प्रशिक्षक? शास्त्रींनी केला खुलासा

Ravi Shastri होणार आयपीएलमधील नव्या संघाचे प्रशिक्षक? शास्त्रींनी केला खुलासा

Ravi Shastri

Ravi Shastri

आगामी आयपीएल हंगामातील (IPL2022) नव्या संघाचे प्रशिक्षक होणार रवि शास्त्री (Ravi Shastri ) होणार अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे.

  • Published by:  Dhanshri Otari

नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर: टी 20 वर्ल्डकप संपल्यानंतर टीम इंडियाचे मुख्य कोच रवि शास्त्री (Ravi Shastri ) यांचा कार्याकाळही संपुष्टात आला. त्यानंतर शास्त्री आता कोणती कामगिरी हातात घेणार अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान, ते आगामी आयपीएल हंगामातील (IPL2022) नव्या संघाचे प्रशिक्षक होणार या चर्चेला क्रिकेट जगतात उत आला आहे. यावर शास्त्रींनी स्वतः खुलासा करत चर्चेला पुर्णविराम दिला आहे.

भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदानंतर माजी भारतीय प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान आयपीएलच्या कोणत्याही संघाच्या कोचिंगबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना खुलेपणाने आपले उत्तर दिले.

पुढच्या टप्प्यासाठी अजून वेळ आहे. मी फक्त विश्रांती घेईन आणि खेळाच्या बर्‍याच गोष्टी केल्या जाऊ शकतात. क्रिकेट हा खूप मोठा खेळ आहे आणि हळूहळू तो वाढत आहे. मीडिया आणि डिजिटल क्षेत्रातही खूप विकास झाला आहे. सध्या माझे विचार वेगवेगळ्या दिशेने जात आहेत. मी नक्की कोचिंग करेन. ग्रासरूट लेवलवर काम करेन यात शंका नाही.

जर आयपीएलमध्ये संधी मिळाली तर मी त्याला नाही म्हणणार नाही. टीव्हीमध्येही काम करण्याची संधी मिळणार आहे. सध्या हा वेळ माझ्यासाठी विश्रांतीचा आहे. असे उत्तर शास्त्री यांनी यावेळी दिले.

पुढील हंगामात दोन नवीन आयपीएल संघांची भर पडल्याने प्रशिक्षकांची संख्याही वाढणार आहे. रवी शास्त्री आयपीएलमध्ये अहमदाबाद संघाचे प्रशिक्षक बनू शकतात, अशी माहिती सध्या व्हायरल होत आहे. आयपीएल 2022 मध्ये अहमदाबाद व्यतिरिक्त लखनौ देखील पुढील हंगामात सहभागी होणार आहे.

First published:

Tags: Ipl 2022, Ravi shastri