• Home
  • »
  • News
  • »
  • sport
  • »
  • WTC Final : विराटने गमावली आणखी एक ICC ट्रॉफी, न्यूझीलंडने इतिहास घडवला

WTC Final : विराटने गमावली आणखी एक ICC ट्रॉफी, न्यूझीलंडने इतिहास घडवला

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) टीम इंडियाचा (India vs New Zealand) धक्कादायक पराभव झाला आहे.

  • Share this:
    साऊथम्पटन, 23 जून : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) टीम इंडियाचा (India vs New Zealand) धक्कादायक पराभव झाला आहे. फायनलच्या राखीव म्हणजेच अखेरच्या दिवशी न्यूझीलंडला विजयासाठी 139 रनची गरज होती. या आव्हानाचा पाठलाग केन विलियमसन (Kane Williamson) आणि रॉस टेलर (Ross Taylor) यांनी नाबाद राहून केला. केन विलियमसन याने अर्धशतकी खेळी करत न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. या आव्हानाचा पाठलाग करायला आलेल्या न्यूझीलंडने सावध सुरुवात केली. नव्या बॉलनेही भारताच्या फास्ट बॉलरना विकेट घेता आल्या नाहीत, अखेर आर.अश्विन याने न्यूझीलंडचे ओपनर टॉम लेथम आणि डेवॉन कॉनवे यांना माघारी धाडलं. या दोन विकेट गेल्यानंतर मात्र विलियमसन आणि टेलर यांनी भारताला एकही यश मिळवून दिलं नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये टीम इंडियाचे बॅट्समन सपशेल अपयशी ठरले आहेत. अखेरच्या दिवशी टीम इंडियाचा 170 रनवर ऑल आऊट झाला आहे, त्यामुळे न्यूझीलंडला आता विजयासाठी 138 रनची गरज आहे. अखेरच्या दिवसाची सुरुवात भारताने 64/2 अशी केली होती, पण दिवसाच्या सुरुवातीलाच काईल जेमिसनने भारताला विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराच्या रुपात दोन धक्के दिले. यानंतर अजिंक्य रहाणेही लवकर माघारी परतला. ऋषभ पंतने 41 रनची खेळी केली. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर बोल्टला 3 विकेट मिळाल्या. काईल जेमिसनने 2 आणि नील वॅगनरने 1 विकेट घेतली. या टेस्टच्या पहिल्या आणि चौथ्या दिवशी पावसामुळे खेळ होऊ शकला नाही, तर पाचव्या दिवशीही पावसामुळेच सामना एक तास उशीरा सुरू झाला. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीही खराब प्रकाशामुळे संपूर्ण दिवसाचा खेळ होऊ शकला नाही, त्यामुळे सहाव्या दिवशी सामना खेळवला गेला.
    Published by:Shreyas
    First published: