IND vs NZ: अटीतटीच्या लढतीत न्यूझीलंडचा भारतावर विजय, मालिका 2-1ने जिंकली

IND vs NZ: अटीतटीच्या लढतीत न्यूझीलंडचा भारतावर विजय, मालिका 2-1ने जिंकली

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम टी-20 सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Share this:

हॅमिसल्टन, 10 फेब्रुवारी: अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात न्यूझीलंडने भारतावर 4 धावांनी विजय मिळवला. या विजयासह न्यूझीलंडने 3 सामन्यांची मालिका 2-1अशी जिंकली.

विजयासाठी 213 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर शिखर धवन बाद झाला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि विजय शंकर यांनी संघाचे अर्धशतक पूर्ण करून दिले. पण आक्रमक खेळी करणारा शंकर 43 धावांवर बाद झाला. त्याने 2 षटकार आणि 5 चौकार मारले. शंकरच्या जागी आलेल्या ऋषभ पंतने आक्रमक खेळी करत 12 चेंडूत 28 धावा केल्या. पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. पंतनंतर रोहित शर्मा 38 धावांवर बाद झाला.

हे देखील वाचा: स्वप्नभंग! भारताच्या पराभवाने पाकिस्तानचा विक्रम अबाधित

मधल्या फळीतील हार्दिक पांड्या आणि धोनी अनुक्रमे 21 आणि 4 धावा केल्या. तेव्हा भारताची अवस्था 6 बाद 145 होती आणि मैदानात कार्तिक आणि कुणाल पांड्या होते. सामना अखेरच्या षटकापर्यंत पोहोचला तेव्हा भारताला विजयासाठी 6 चेंडूत 16 धावा होत्या. या षटकात दोन चेंडूवर एकही धाव घेता आली नाही. अखेरच्या चेंडूवर कार्तिकने षटकार मारला खरा पण विजयासाठी भारताला 4 धावा कमीच पडल्या.

वाचा: न्यूझीलंडच्या कर्णधाराचा 26 वर्ष जुना 'मास्टर स्ट्रोक', गब्बर अडकला जाळ्यात

त्याआधी तिसऱ्या आणि अंतिम टी-20 सामन्यात न्यूझीलंडने भारतापुढे विजयासाठी 213 धावांचे आव्हान दिले होते. सलामीवीर कॉलिन मुन्रो आणि टिम सेफर्ट यांच्या आक्रमक खेळीमुळे न्यूझीलंडने पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजींची धुलाई केली. त्यांच्याकडून मुन्नोने सर्वाधिक 76 धावा केल्या.

निर्णायक टी-20 सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण कर्णधार रोहित शर्माचा हा निर्णय पुन्हा चुकला. मुन्नो आणि सेफर्ट यांनी पहिल्या विकेटसाठी 80 धावांची भागिदारी केली. सेफर्टला चपळाईने बाद करत धोनीने संघाला पहिले यश मिळवून दिले. सेफर्ट 43 धावांवर बाद झाला. त्यानंतर कुलदिप यादवने मुन्रोची विकेट घेतली.

LIVE अपडेट

- न्यूझीलंडचा भारतावर 4 गडी राखून विजय

- भारताला विजयासाठी हव्यात 6 चेंडूत 16 धावा

- 18 षटकात भारताच्या 6 बाद 183 धावा

- भारताची अवस्था बिकट, धोनीही तंबूत परतला.

- 10 षटकात भारताच्या 2 बाद 108 धावा

- भारताची दुसरी विकेट, विजय शंकर 43 धावांवर बाद

- 6 षटकात भारताच्या 1 बाद 57 धावा

- 4 षटकात भारताच्या 1 बाद 38 धावा

- भारताला पहिला धक्का, धवन 5 धावा करुन बाद

- भारताच्या डावाला सुरुवात, शिखर धवन आणि रोहित शर्मा मैदानात

- न्यूझीलंडच्या 20 षटकात 4 बाद 212 धावा

- न्यूझीलंडला चौथा धक्का, कॉलिन डी ग्रँडहोम 30 धावांवर बाद

- 17 षटकात न्यूझीलंडच्या 3 बाद 182 धावा

- 15 षटकात न्यूझीलंडच्या 3 बाद 151 धावा

- न्यूझीलंडला दुसरा धक्का, कॉलिन मुन्रो 76 धावांवर बाद

- 12 षटकात न्यूझीलंडच्या 1 बाद 118 धावा

- 10 षटकात न्यूझीलंडच्या 1 बाद 96 धावा

- टिम सेफर्ट 43 धावांवर बाद, न्यूझीलंड 1 बाद 80

- 7 षटकात न्यूझीलंडच्या 0 बाद 79 धावा

- 5 षटकात न्यूझीलंडच्या 0 बाद 46 धावा

- 3 षटकात न्यूझीलंडच्या 0 बाद 22 धावा

- कॉलिन मुन्रो आणि टिम सेफर्ट यांनी न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात केली

First published: February 10, 2019, 12:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading