मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

NZ vs PAK : शेवटच्या 5 ओव्हर, 1 विकेटची गरज... रोमांचक टेस्टमध्ये न्यूझीलंडचा पाकिस्तानवर विजय

NZ vs PAK : शेवटच्या 5 ओव्हर, 1 विकेटची गरज... रोमांचक टेस्टमध्ये न्यूझीलंडचा पाकिस्तानवर विजय

न्यूझीलंड आणि पाकिस्तान (New Zealand vs Pakistan) यांच्यातली पहिली टेस्ट मॅच अत्यंत रोमांचक अशी झाली.

  • Published by:  Shreyas

माऊंट मांगनुई, 30 डिसेंबर : न्यूझीलंड आणि पाकिस्तान (New Zealand vs Pakistan) यांच्यातली पहिली टेस्ट मॅच अत्यंत रोमांचक अशी झाली. शेवटच्या 5 ओव्हरमध्ये न्यूझीलंडला पाकिस्तानची शेवटची विकेट हवी होती, तेव्हा मिचेल सॅन्टनर याने नसीम शाह याला माघारी धाडलं, त्यामुळे न्यूझीलंडचा पहिल्या टेस्टमध्ये 101 रनने विजय झाला. न्यूझीलंडने पाकिस्तानला शेवटच्या इनिंगमध्ये विजयासाठी 373 रनचं आव्हान दिलं होतं. पण पाकिस्तानचा 271 रनवर ऑल आऊट झाला. फवाद आलम याने 102 रन तर कर्णधार मोहम्मद रिझवान याने 60 रनची खेळी केली. न्यूझीलंडकडून बोल्ट, साऊदी, जेमीसन, वॅगनर आणि सॅन्टनर यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. पाकिस्तानने या टेस्टमध्ये टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर न्यूझीलंडने पहिल्या इनिंगमध्ये 431 रन केले, पण पाकिस्तानचा 239 रनवर ऑल आऊट झाल्यामुळे किवींना मोठी आघाडी मिळाली. दुसऱ्या इनिंगमध्ये न्यूझीलंडने त्यांचा डाव 180-5 वर घोषित केला, त्यामुळे पाकिस्तानला विजयासाठी 373 रनचं आव्हान मिळालं. 11 वर्षानंतर फवाद आलम याने पाकिस्तानकडून टेस्ट क्रिकेटमधलं दुसरं शतक केलं. 2 टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये न्यूझीलंडने 1-0 ने आघाडी घेतली आहे. आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलची स्पर्धा न्यूझीलंडच्या या विजयामुळे आणखी रोमांचकारक झाली आहे.

First published:

पुढील बातम्या