मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

NZ vs PAK : किवींनी इतिहास घडवला! टेस्ट क्रिकेटमध्ये न्यूझीलंड पहिल्यांदाच अव्वल

NZ vs PAK : किवींनी इतिहास घडवला! टेस्ट क्रिकेटमध्ये न्यूझीलंड पहिल्यांदाच अव्वल

केन विलियमसन (Kane Williamson) याच्या नेतृत्वात न्यूझीलंडने (New Zelanad vs Pakistan) टेस्ट क्रिकेटमध्ये इतिहास घडवला आहे. न्यूझीलंडची टीम पहिल्यांदाच आयसीसी टेस्ट क्रमवारीत (ICC Test Ranking) पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे.

  • Published by:  Shreyas

माऊंट मांगनुई, 30 डिसेंबर : केन विलियमसन (Kane Williamson) याच्या नेतृत्वात न्यूझीलंडने (New Zelanad vs Pakistan) टेस्ट क्रिकेटमध्ये इतिहास घडवला आहे. न्यूझीलंडची टीम पहिल्यांदाच आयसीसी टेस्ट क्रमवारीत (ICC Test Ranking) पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये न्यूझीलंडचा 101 रनने पराभव केल्यामुळे केन विलियमसनच्या टीमने अव्वल स्थान गाठलं. 2020 या वर्षातला न्यूझीलंडचा हा सलग पाचवा विजय आहे.

पाकिस्तानची अवस्था 75-4 अशी केल्यानंतर न्यूझीलंडचा शेवटच्या दिवशी अगदी सहज विजय होईल, असं वाटत होतं, फण फवाद आलमचं शतक आणि मोहम्मद रिझवानच्या अर्धशतकामुळे न्यूझीलंडसमोर अडचणी निर्माण झाल्या. या दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी 165 रनची पार्टनरशीप झाली. फवाद आलम याने 102 रन आणि मोहम्मद रिझवान याने 60 रन केले.

यावर्षाच्या सुरुवातीलाल न्यूझीलंडने भारताचा टेस्ट सीरिजमध्ये 2-0 ने पराभव केला होता. तसंच भारताने मेलबर्न टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्याचा फायदाही न्यूझीलंडला अव्वल स्थान गाठण्यात झाला. आता पॉईंट्स टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया दुसऱ्या आणि भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

पाचव्या दिवसाच्या सुरुवातीला दुसऱ्याच ओव्हरमध्ये न्यूझीलंडने अझर अलीला माघारी धाडलं. यानंतर टेस्ट मॅच लवकर संपेल असं वाटत असताना फवाद आलम आणि मोहम्मद रिझवान यांनी 165 रनची पार्टनरशीप केली. दिवसाच्या 90 ओव्हरपैकी या दोघांनी 62.5 ओव्हर बॅटिंग केली.

शेवटच्या सत्राला जेव्हा सुरूवात झाली तेव्हा मॅच ड्रॉ होईल, असं वाटत असतानाच काईल जेमिसनने रिझवानला आऊट केलं, यानंतर फवाद आलमही माघारी परतला. पाकिस्तानच्या शेवटच्या 4 विकेट 20 रन आणि 15 ओव्हरमध्येच गेल्या.

नसीम शाह आणि शाहीन आफ्रिदी या शेवटच्या जोडीने 7.5 ओव्हर बॅटिंग केली. दिवसाच्या पाच ओव्हर बाकी असताना मिचेल सॅन्टनरने नसीमची विकेट घेतली. न्यूझीलंडच्या पाचही बॉलरनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. पहिल्या इनिंगमध्ये 129 रन करणाऱ्या केन विलियमसनला मॅन ऑफ द मॅच देण्यात आलं.

First published: