मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

11 वर्षानंतर या खेळाडूने झळकावलं शतक, टीमबाहेर गेल्यावर केलं नाटकात काम

11 वर्षानंतर या खेळाडूने झळकावलं शतक, टीमबाहेर गेल्यावर केलं नाटकात काम

न्यूझीलंडने पाकिस्तानविरुद्ध (Pakistan vs New Zealand) झालेल्या बॉक्सिंग डे टेस्ट मॅचमध्ये 101 रननी दणदणीत विजय मिळवला. या मॅचमध्ये पाकिस्तानच्या फवाद आलम (Fawad Alam) याने अजब रेकॉर्ड केला आहे.

माऊंट मांगनुई, 30 डिसेंबर : न्यूझीलंडने पाकिस्तानविरुद्ध (Pakistan vs New Zealand) झालेल्या बॉक्सिंग डे टेस्ट मॅचमध्ये 101 रननी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह न्यूझीलंडने 2 मॅचच्या टेस्ट सिरीजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मॅचमध्ये शेवटच्या दिवसाच्या शेवटच्या सत्रापर्यंत कोणताही निकाल लागण्याची शक्यता होती. मात्र अखेर न्यूझीलंडच्या बॉलरनी अखेरच्या सत्रात चांगली बॉलिंग करत 373 रनच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानला 271 धावांवर रोखले. या मॅचमध्ये पाकिस्तानच्या फवाद आलम (Fawad Alam) आणि कॅप्टन मोहम्मद रिझवान यांनी चांगली बॅटिंग करत पाकिस्तानचा पराभव टाळण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यामध्ये अपयश आलं. या मॅचमध्ये फवाद आलम (Fawad Alam) याने रेकॉर्ड करत आपलं दुसरी टेस्ट शतक तब्बल 11 वर्षांनी झळकावलं. या मॅचच्या दुसऱ्या इनिंगमध्ये त्याने 296 बॉलवर 102 रन बनवले. पण त्याला आपलं दुसरं शतक बनवण्यासाठी तब्बल 11 वर्षांची वाट पाहायला लागली. 2007 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. पण चांगली कामगिरी करता न आल्यानं त्याला टीममध्ये आपलं स्थान कायम राखण्यात अपयश आलं आहे. 2015 पर्यंत त्याने पाकिस्तानकडून वनडे क्रिकेट खेळलं. त्यानंतर त्याला टीममधून डच्चू देण्यात आला. पण स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्यानं त्याला पुन्हा टीममध्ये संधी देण्यात आली. याच संधीचा त्यानं पुरेपूर फायदा घेत 11 वर्षानंतर टेस्टमध्ये शतक करण्यात यश मिळवलं. 2009 मध्ये पहिली टेस्ट सेंचुरी फवाद आलम (Fawad Alam) याने 2009 मध्ये श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) टेस्ट मध्ये पदार्पण केलं होतं. या मॅचमध्ये त्याने शानदार कामगिरी करत पहिल्याच मॅचमध्ये टेस्ट शतक करण्याचा विक्रम केला होता. पण त्यानंतर त्याला चांगली कामगिरी करता न आल्यानं पाकिस्तान (Pakistan) टीममधून बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर तब्बल 10 वर्षांनी त्याला पुन्हा टेस्ट टीममध्ये खेळण्याची संधी मिळाली. यावर्षी इंग्लंड (England) दौऱ्यात त्याला खेळण्याची संधी मिळाल्यानांतर त्याने आता न्यूझीलंड दौऱ्यात शतक करत आपला फॉर्म दाखवून दिला आहे. 2015 मध्ये वनडे टीममधून देखील बाहेर पडल्यानंतर त्याने मागच्या वर्षी एका कॉमेडी नाटकात देखील काम केलं होतं.
First published:

पुढील बातम्या