Home /News /sport /

वकार युनूस पाकिस्तान टीमचा न्यूझीलंड दौरा अर्धवट सोडून घरी येणार

वकार युनूस पाकिस्तान टीमचा न्यूझीलंड दौरा अर्धवट सोडून घरी येणार

पाकिस्तान टीमचे बॉलिंग प्रशिक्षक वकार युनूस (Waqar Younis) न्यूझीलंड दौरा अर्धवट सोडून पाकिस्तानला परतणार आहेत. न्यूझीलंडविरुद्धची (New Zealand vs Pakistan) बॉक्सिंग डे टेस्ट मॅच संपल्यानंतर वकार निघणार असल्याचं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) सांगितलं.

पुढे वाचा ...
    ऑकलंड, 22 डिसेंबर : पाकिस्तान टीमचे बॉलिंग प्रशिक्षक वकार युनूस (Waqar Younis) न्यूझीलंड दौरा अर्धवट सोडून पाकिस्तानला परतणार आहेत. न्यूझीलंडविरुद्धची (New Zealand vs Pakistan) बॉक्सिंग डे टेस्ट मॅच संपल्यानंतर वकार निघणार असल्याचं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) सांगितलं. कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी वकार न्यूझीलंड दौरा अर्धवट सोडणार आहे. न्यूझीलंड दौऱ्यानंतर दक्षिण आफ्रिकेची टीम पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यातली पहिली टेस्ट 26 जानेवारीपासून कराचीमध्ये होईल, या टेस्टसाठी वकार टीमसोबत असेल. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातली पहिली टेस्ट 26 डिसेंबरपासून तर दुसरी टेस्ट 2 जानेवारीपासून सुरू होईल. या दोन टेस्ट माऊंच मांगनुई आणि क्राईस्टचर्चमध्ये खेळवल्या जातील. मागच्या सहा महिन्यांपासून वकार युनूस त्याच्या कुटुंबाला भेटलेला नाही. न्यूझीलंड दौरा संपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धची सीरिज 14 फेब्रुवारीपर्यंत संपणार नाही, त्यामुळे घरी लवकर परतता यावं, यासाठी वकार युनूसने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे परवानगी मागितली होती, याला बोर्डाने मंजुरी दिली. न्यूझीलंड दौऱ्यात पाकिस्तान टीम तीन टी-20 आणि दोन टेस्ट मॅच खेळणार आहे. यातल्या पहिल्या दोन टी-20 मॅचमध्ये पाकिस्तानचा पराभव झाला, तर तिसरी मॅच त्यांनी जिंकली. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याच्या मनगटाला दुखापत झाल्यामुळे तो टी-20 सीरिज आणि पहिल्या टेस्टला मुकणार आहे, त्याच्याऐवजी विकेट कीपर मोहम्मद रिझवान पहिल्या टेस्टमध्ये पाकिस्तानचं नेतृत्व करेल.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या