लॉर्ड्स, 3 जून : न्यूझीलंडचा ओपनर डेवॉन कॉनवे (Devon Conway) याने इतिहासाला गवसणी घातली आहे. आपल्या पदार्पणाच्या टेस्ट मॅचमध्येच कॉनवेने द्विशतक केलं आहे. 347 बॉलमध्ये 200 रन करून कॉनवे आऊट झाला. पदार्पणाच्या टेस्टमध्येच द्विशतक करणारा कॉनवे हा सहावा क्रिकेटपटू ठरला आहे. तसंच इंग्लंडमध्ये पदार्पणाच्या सामन्यातच द्विशतक ठोकणारा कॉनवे पहिलाच क्रिकेटपटू आहे.
डेवॉन कॉनवे याने सौरव गांगुलीचा विक्रमही मोडित काढला आहे. सौरव गांगुलनेही लॉर्ड्सच्या मैदानावरूनच टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. आपल्या पहिल्याच सामन्यात गांगुलीने 131 रनची खेळी केली. लॉर्ड्सच्या मैदानावर पदार्पणाच्या सामन्यातली ही सगळ्यात मोठी खेळी होती, पण कॉनवेने गांगुलीचा हा विक्रम मोडला आहे.
कॉनवेने मोडला 125 वर्ष जुना विक्रम
कॉनवे याने या सामन्यात 125 वर्ष जुनं रेकॉर्डही तोडलं आहे. याआधी इंग्लंडमध्ये पदार्पणाच्या सामन्यातच सर्वाधिक रन करण्याचा विक्रम रणजीतसिंगजी यांच्या नावावर होता. रणजीतसिंगजी यांनी 1896 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंडमध्ये 154 नाबाद रनची खेळी केली होती.
कॉनवेचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धमाका
डेवॉन कॉनवेने सुरुवातीलाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धमाका केला आहे. न्यूझीलंडकडून खेळलेल्या 14 टी-20 मॅचमध्ये त्याने 59.12 च्या सरासरीने 473 रन केले. तर 3 वनडेमध्ये त्याने 75 च्या सरासरीने 225 रन ठोकले. कॉनवे अजून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवीन आहे, पण त्याची शैली एखाद्या अनुभवी खेळाडूप्रमाणे आहे. कॉनवे न्यूझीलंडकडून टी-20 मध्ये लागोपाठ 5 अर्धशतकं करणारा पहिला बॅट्समन आहे.
पदार्पणातच इंग्लंडमध्ये सर्वाधिक स्कोअर
डेवॉन कॉनवे- (200 रन इंग्लंडविरुद्ध 2021)
केएस रणजीतसिंगजी- (154 रन नाबाद, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1896)
डब्ल्यू जी ग्रेस- (152 रन नाबाद, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1880)
लॉर्ड्सवर सर्वाधिक स्कोअर करणारा न्यूझीलंडचा खेळाडू
मार्टीन डॉनले- 206 रन
डेवॉन कॉनवे- 200 रन
बेव्हन कॉन्गडॉन- 175 रन
टेस्ट पदार्पणात सर्वाधिक स्कोअर
टीप फॉस्टर- 287 रन, इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया- 1903/04
जॅक रुडॉल्फ- 222 रन नाबाद, दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांग्लादेश, 2003
लॉरेन्स रो- 214 रन, वेस्ट इंडिजविरुद्ध न्यूझीलंड, 1971/72
मॅथ्यू सिनक्लेयर- 214 रन, न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज, 1999/2000
ब्रॅण्डन कुरुप्पू- 201 रन नाबाद, श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड, 1987
डेवॉन कॉनवे- 200 रन, न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड, 2021
देशाबाहेर पदार्पणात सर्वाधिक रन करणारे
287 – टीम फॉस्टर (इंग्लंड) सिडनीमध्ये, 1903
222* – जॅक रुडॉल्फ (दक्षिण आफ्रिका) चट्टोग्राममध्ये, 2003
210* – काईल मेयर्स (वेस्ट इंडिज) चट्टोग्राममध्ये, 2021
200 – डेवॉन कॉनवे (न्यूझीलंड) लंडनमध्ये, 2021
168 – फवाद आलम (पाकिस्तान) कोलंबोमध्ये, 2009
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news