मुंबई, 26 मार्च : न्यूझीलंडचा फास्ट बॉलर ट्रेन्ट बोल्टने (Trent Boult) बांगलादेशविरुद्धच्या (New Zealand vs Bangladesh) तिसऱ्या वनडेमध्ये हवेत उडी मारून भन्नाट कॅच पकडला. बोल्टच्या या कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बांगलादेशची बॅटिंग सुरू असताना सातव्या ओव्हरमध्ये बोल्टने हा कॅच पकडला. मॅट हेन्री बॉलिंग करत असताना स्ट्राईकवर बांगलादेशचा ओपनर लिटन दास (Liton Das) होता. हेन्रीने ऑफ स्टम्पवर टाकलेल्या बॉलवर लिटन दासने पूल शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण बॅटच्या वरचा किनारा लागल्यामुळे बॉल थर्ड मॅनच्या दिशेने गेला.
थर्ड मॅनला फिल्डिंगला उभा असलेला बोल्ट धावत पुढे आला आणि उडी मारून एका हाताने कॅच पकडला. न्यूझीलंडचे खेळाडू आणि लिटन दास यालाही बोल्टने कॅच पकडल्यावर विश्वास बसला नाही. 21 रनवर दास माघारी परतला. आयसीसीनेही त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून बोल्टच्या या कॅचचा व्हिडिओ ट्वीट केला आहे.
Hold the pose, @trent_boult 🕺 A ridiculous catch from the @BLACKCAPS quick.#NZvBAN | https://t.co/LS5M85fSzJpic.twitter.com/kbW3yPpNOJ
— ICC (@ICC) March 26, 2021
न्यूझीलंडने केला व्हाईट वॉश
या मॅचमध्ये न्यूझीलंडने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. डेवन कॉनवेने 126 रन तर डॅरेल मिचेलने नाबाद 100 रनची खेळी केली, त्यामुळे न्यूझीलंडने 6 विकेट गमावून 318 रन केले. बांगलादेशकडून रुबेल हुसेनने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. न्यूझीलंडच्या 319 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा 42.4 ओव्हरमध्ये 154 रनवर ऑल आऊट झाला आणि किवी टीमचा 164 रनने विजय झाला.
बांगलादेशकडून महमदुल्लाहने सर्वाधिक नाबाद 76 रन केले. न्यूझीलंडकडून जेम्स नीशमने 5, मॅट हेन्रीने 4 विकेट घेतल्या. या विजयासोबतच न्यूझीलंडने तीन वनडे मॅचची सीरिज 3-0 ने जिंकली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news