माऊंट मांगनुईमध्ये झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 21 रनने विजय झाला. वनडे क्रिकेटमधला ऑस्ट्रेलियाच्या महिला टीमचा हा लागोपाठ 24वा विजय आहे. याचसोबत ऑस्ट्रेलियाने तीन वनडे मॅचची ही सीरिज 3-0 ने जिंकली. पावसामुळे ही मॅच 25-25 ओव्हरची करण्यात आली होती. न्यूझीलंडने पहिले बॅटिंगला बोलावल्यानंतर ऑस्ट्रेलियाने 7 विकेट गमावून 149 रन केले. एलिसा हिलीने 46 आणि मुनीने 28 रनची खेळी केली. न्यूझीलंडकडून कासपेरेकने 3 आणि ली ताहूहूने 2 विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडला 25 ओव्हरमध्ये 128 रनच करता आले. नवव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या तुहूहूने सर्वाधिक 21 रन केले. ऑस्ट्रेलियाकडून मेगान शट आणि जॉर्जिया वारेहामने प्रत्येकी दोन-दोन विकेट घेतल्या.Leigh Kasperek shone against the Aussies on Wednesday and with tactics like this, we see why. A 38kmph slower ball 😳 Join us live, only on Spark Sport #NZvAUS pic.twitter.com/L49IzfQL2k
— Spark Sport (@sparknzsport) April 10, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news