आधी होता पॉर्नस्टार आता झाला क्रिकेट अम्पायर! नाव बदलून केल्या ब्लू फिल्म

आधी होता पॉर्नस्टार आता झाला क्रिकेट अम्पायर! नाव बदलून केल्या ब्लू फिल्म

पॉर्न करिअरसोडून त्यांनी घेतला अम्पायर होण्याचा निर्णय. जगभरातून होतोय कौतुकांचा वर्षाव.

  • Share this:

नेपियर, 08 नोव्हेंबर : प्रत्येक जण आपल्या भुतकाळातील चुकांमधून शिकत असतात. यातूनच एक व्यक्ति म्हणून आपण पुढे जातो. असाच प्रकार क्रिकेटमध्ये पाहायला मिळाला. जेव्हा एका पॉर्नस्टारनं आपला भुतकाळविसरून क्रिकेटमध्ये येण्याचा निर्णय घेतला.

न्यूझीलंड आणि इंग्लंड (New Zealand vs England) या दोन संघांमध्ये पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेत यजमान न्यूझीलंडनं 2-1नं आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवत विजयी आघाडी घेणाऱ्या इंग्लंड संघाला पुढच्या दोन सामन्यात पराभवाचा धक्का सहन करावा लागला. दुसऱ्या सामन्यात इयॉन मॉर्गननं 21 तर तिसऱ्या सामन्यात 14 धावा केल्या. त्यामुळं आक्रमक फलंदाजीविना इंग्लंड संघाला विजयी कामगिरी करता आली नाही.

सध्या इंग्लंड संघाचे लक्ष नेपियरमध्ये होणाऱ्या सामन्यावर आहे. मात्र या सगळ्यात सर्वात चर्चेचा विषय ठरले ते चौथे पंच गर्थ स्टिरॅट (Garth Stirrat). तिसऱ्या टी-20 सामन्यात पंच असणारे गर्थ हे आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात नॉर्न स्टार होते. द सननं दिलेल्या माहितीनुसार, गॅरेथ यांच्यावर आरोप करण्यात आला होता की, गर्थ यांनी एका पॉर्न मॅगजीनवर स्टिव्ह पॉर्नेल या नावानं फोटोशुट केले होते. या आरोपांवर गर्थ यांनी प्रतिक्रिया देत, “माझ्या भुतकाळाबाबत मी काहीच बोलणार नाही”, असे सांगितले.

वाचा-भाजप-सेनेच्याच नाही तर क्रिकेट प्रेमींच्याही नागपूरकडे नजरा

करिअरच्या सुरुवातीला केले होते हे काम

50 वर्षीय गर्थ न्यूझीलंड हॉटेल कॉउन्सिलचे प्रमुखही राहिले आहेत. मात्र त्यांचा भुतकाळसमोर आल्यानंतर त्यांना हे पद सोडावे लागले. 2010मध्ये न्यूझीलंड हॉटेलच्या प्रमुख जेनी लेंग्ले यांनी मिररशी बोलताना, “गर्थ यांनी त्यांच्याशी चर्चा करत सहा वर्ष काही पॉर्न चित्रपटांमध्ये काम केले असल्याची कबुली दिली. एकटे राहत असताना आणि करिअरच्या सुरुवातीला त्यांनी हे सांगितले. गर्थ यांचा भुतकाळसमोर आल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

वाचा-पंतच्या ‘त्या’ स्टम्पिंगवर रोहितनं चक्क तिसऱ्या पंचांना घातली शिवी, VIDEO VIRAL

पंच होण्याआधी क्रिकेटही खेळले होते गर्थ

2003मध्ये गर्थ यांनी अडल्ट सिनेमांमध्ये काम केले होते. एवढेच नाही तर गर्थ हे न्यूझीलंड गोल्फ असोसिएशनचे प्रमुख राहिले आहेत. 2008मध्ये त्यांनी या पदाचाही राजीनामा दिला होता. दरम्यान यानंतर त्यांनी टी-20 सामन्यात चौथा पंच म्हणून गर्व वाटतो, असेही ते म्हणाले. महत्त्वाची बाब म्हणजे गर्थ यांचा सामन्यादरम्यानच वाढदिवस होता.

वाचा-फलंदाज होता आऊट पण पंतच्या एका चुकीमुळं NOT OUT, पाहा लाजिरवाणा VIDEO

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बर्निंग कारचा थरार; पाहा LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 8, 2019 06:06 PM IST

ताज्या बातम्या