स्वप्नभंग! भारताच्या पराभवाने पाकिस्तानचा विक्रम अबाधित

भारताला पाकिस्तानच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी मिळाली होती.

  • Share this:

भारतीय क्रिकेट संघ विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडविरुद्ध टी20 मालिकेत 2-1 ने पराभूत झाला. न्यूझीलंडच्या या विजयाने भारताची टी20 मालिका विजयाची परंपरा खंडीत झाली.

आज होणाऱ्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात भारत पराभूत झाल्याने कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानच्या एका विक्रमाशी बरोबरी साधता आली नाही.

भारतीय संघ गेल्या 10 टी20 मालिकेत अजिंक्य होता. भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली होती.

भारताच्या या मालिका पराभवाने पाकिस्तानच्या सलग 11 टी20 मालिका जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरी करण्याचं स्वप्न भंगले.

भारताला पाकिस्तानच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी मिळाली होती. मात्र न्यूझीलंडने भारताला पराभूत केल्याने पाकिस्तानचा विक्रम अबाधित राहिला. भारताने 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध आपल्या विजयी मालिकेला सुरुवात केली होती.

पाकिस्तानचा विजयी रथ दक्षिण आफ्रिकेने रोखला होता. याच महिन्यात झालेल्या मालिकेत पाकिस्तानला दक्षिण आफ्रिकेने पराभूत केले. टी20 वर्ल्डकपनंतर पाकिस्तानचा हा पहिला पराभव होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 10, 2019 04:14 PM IST

ताज्या बातम्या