IND vs NZ : भारताविरुद्ध तिसऱ्या टी-20 सामन्याआधी किवींना झटका, स्टार गोलंदाजाने घेतली निवृत्ती

IND vs NZ : भारताविरुद्ध तिसऱ्या टी-20 सामन्याआधी किवींना झटका, स्टार गोलंदाजाने घेतली निवृत्ती

भारत-न्यूझीलंड यांच्यात हॅमिल्टन येथे 29 जानेवारी रोजी तिसरा टी-20 सामना खेळला जाणार आहे. मात्र या सामन्याआधी न्यूझीलंड संघाला मोठा झटका बसला आहे.

  • Share this:

हॅमिल्टन, 28 जानेवारी : भारत-न्यूझीलंड यांच्यात हॅमिल्टन येथे 29 जानेवारी रोजी तिसरा टी-20 सामना खेळला जाणार आहे. मात्र या सामन्याआधी न्यूझीलंड संघाला मोठा झटका बसला आहे. न्यूझीलंड संघाचा अनुभवी गोलंदाज टॉड एस्ले (Todd Astle) याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

फिरकी गोलंदाज टॉड एस्लेने टी-20 आणि वनडे क्रिकेटकडे लक्ष देण्यासाठी त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. यासह, तो भारत अ विरुद्धच्या आगामी प्रथम श्रेणी मालिकेत न्यूझीलंड ए संघाकडून टॉड खेळणार नाही.

वाचा-माहीची ‘ती’ जागा अजूनही रिकामी! धोनीच्या आठवणीत भावुक झाला चहल

वाचा-यंदाच्या IPL 2020 मध्ये लागू होणार नवीन नियम, सौरंभ गांगुलींनी केली घोषणा

33 वर्षीय टॉडची कसोटी कारकीर्द आठ वर्षांच्या जवळपास होती, परंतु त्याने केवळ पाच कसोटी सामने खेळले. 2012मध्ये श्रीलंकेविरुद्ध पदार्पण करणाऱ्या टॉडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे नुकताच अखेरचा कसोटी सामना खेळला होता. टॉडनं जारी केलेल्या निवेदनात, कसोटी क्रिकेट खेळणे हे माझे स्वप्न आहे आणि आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे, असे सांगितले. तसेच, कसोटी क्रिकेटबद्दल म्हणाले की रेड बॉल म्हणजे क्रिकेटची शिखर आहे, परंतु त्यासाठी अधिक वेळ देण्याची देखील गरज आहे. ऑस्ट्रेलियामधील यजमानांविरुद्धच्या मालिकेत तिसरा कसोटी सामना खेळण्याची संधी टॉडला मिळाली होती, पण किवी संघाने ती मालिका गमावली.

वाचा-IPL 2020 चा अंतिम सामना मुंबईतच, या तारखेला रंगणार फायनल

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 300 हून अधिक बळी

टॉडने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये टीम कँटरबरीकडून 303 विकेट घेतल्या आणि कॅन्टरबरीसाठी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज म्हणून आपली कसोटी कारकीर्द संपविली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 28, 2020 10:43 AM IST

ताज्या बातम्या