न्यूझीलंडविरुद्ध भारतीय महिला संघाचाही दारूण पराभव

न्यूझीलंडविरुद्ध भारतीय महिला संघाचाही दारूण पराभव

भारताने पहिले दोन्ही सामने जिंकून मालिका आधीच जिंकली पण शेवटचा सामना गमावला.

  • Share this:

हॅमिल्टन, 1 फेब्रुवारी : हिटमॅन रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चौथ्या सामन्यात भारताच्या पुरूष संघाचा पराभव झाल्यानंतर आता महिला संघाचा न्यूझीलंडविरूद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पराभव झाला. भारताने दिलेलं 150 धावांचे आव्हान न्यूझीलंडने 29.2 षटकांत 2 विकेट गमावत पूर्ण केलं. भारताने पहिले दोन्ही सामने जिंकून मालिका आधीच जिंकली असली तरीही या पराभवाने न्यूझीलंडला त्यांच्याच भूमीवर व्हाईट वॉश देण्याचं स्वप्न भंगलं.

भारताने दिलेलं 150 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडने सुझी बेटस (57 धावा) आणि अॅमी सॅटर्थवेट (66 धावा यांच्या अर्धशतकांच्या जोरावर सामना जिंकला. भारताच्या पूनम यादवने सुझी बेटसला बाद केले.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतील महिला फलंदाजांना न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी 44 षटकांत 149 धावांत रोखले. भारताकडून दिप्ती शर्माने अर्धशतक (52 धावा)आणि हरमन प्रितने (24 धावा) केल्या. दुसऱ्या सामन्यात नाबाद अर्धशतकी खेळी करणाऱ्या स्मृती मानधना आणि कर्णधार मिताली राज यांना या सामन्यात दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. न्यूझीलंडकडून अॅना पिटरसन हिने 4 विकेट तर लिआ तहुहुने 3 विकेट घेतल्या.

भारताची कर्णधार मिताली राजचा हा 200 वा एकदिवसीय सामना होता. आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळण्याचा विक्रम तिच्याच नावावर आहे.

भारतीय महिला संघाने 24 वर्षानंतर मालिका जिंकली आहे. याआधी भारतीय संघाने 1995 न्यूझीलंडविरुद्ध मालिका 1-0ने जिंकली होती. 2006मध्ये पाच सामन्यांची मालिका भारताने 1-4ने हरली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 1, 2019 12:23 PM IST

ताज्या बातम्या