माउंट माउंगानुई, 27 जानेवारी : भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने 90 धावांनी विजय मिळवला. सोमवारी होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिका खिशात टाकण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरेल.
दरम्यान, मालिकेत भारताचा दबदबा पाहून पाहुण्या संघाला त्यांच्याच पोलिसांनी साबध राहण्यास सांगणारे विनोदी ट्विट केले आहे. न्यूझीलंडमधील पूर्व जिल्हा पोलिसांनी केन विल्यमसनच्या संघाला साधाभोळा तर भारतीय संघाला देशाच्या दौऱ्यावर असलेला समुह असं म्हटलं आहे. भारतीय संघाकडून झालेल्या पराभवाने नाराज झालेल्या न्यूझीलंड पोलिसांनी ट्विट केलं आहे.
न्यूझीलंड पोलिसांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, आम्ही आपल्या देशाच्या दौऱ्यावर असलेल्या एका समुहाच्या कारनाम्यांबद्दल लोकांना सावध करणार आहे. साक्षिदारांनी दिलेल्या माहितीनुसार या समुहाने गेल्या आठवड्यात नेपियर आणि माउंट माउंगानुई या दोन्ही ठिकाणी साधाभोळा दिसत असलेल्या देशातील एका गटाला वाईट पद्धतीने मारहाण केली आहे. जर तुम्ही क्रिकेट बॅट किंवा बॉल घेऊन जात असाल तर अधिक काळजी घ्या.