Home /News /sport /

दहशतवादी हल्ल्याच्या दोन वर्षांनंतर न्यूझीलंडची टीम त्या मशिदीत

दहशतवादी हल्ल्याच्या दोन वर्षांनंतर न्यूझीलंडची टीम त्या मशिदीत

क्राईस्टचर्चमध्ये मशिदीत (Christchurch Mosque Attack) झालेल्या दहशतवादी हल्ल्याला दोन वर्ष झाली आहेत. त्यानंतर पहिल्यांदाच न्यूझीलंड आणि बांगलादेशची (New Zealand vs Bangladesh) टीम क्राईस्टचर्चमध्ये क्रिकेट मॅच खेळणार आहे.

    क्राईस्टचर्च, 21 मार्च : क्राईस्टचर्चमध्ये मशिदीत (Christchurch Mosque Attack) झालेल्या दहशतवादी हल्ल्याला दोन वर्ष झाली आहेत. त्यानंतर पहिल्यांदाच न्यूझीलंड आणि बांगलादेशची (New Zealand vs Bangladesh) टीम क्राईस्टचर्चमध्ये क्रिकेट मॅच खेळणार आहे. या मॅचच्या आधी न्यूझीलंडच्या खेळाडूंनी दहशतवादी हल्ला झालेल्या मशिदीला भेट दिली. हल्ल्यावेळी मशिदीत असलेल्या आणि जीव बचावलेल्या व्यक्तींना खेळाडू भेटले. न्यूझीलंडचे क्रिकेटपटू हेन्री निकोल्स, मॅट हेन्री आणि डॅरेल मिचेल यांनी या व्यक्तींकडून त्या दिवशी नेमकं काय झालं, हे जाणून घेतलं. क्राईस्टचर्चच्या अल-नूर मशिदीवर हल्ला झाला तेव्हा बांगलादेशचे क्रिकेटपटू तिथपासून काही मीटरच्या अंतरावर होते. या हल्ल्यानंतर न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यातली सीरिज रद्द करण्यात आली होती. मंगळवारी या दोन्ही टीममध्ये दुसरी वनडे खेळवली जाणार आहे. हल्ल्यावेळी मशिदीत उपस्थित असणाऱ्यांना न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यातली ही मॅच स्टेडियममधून पाहता येणार आहे. याआधी झालेल्या पहिल्या वनडेमध्ये न्यूझीलंडचा 8 विकेटने विजय झाला होता. न्यूझीलंडच्या बॉलरनी बांगलादेशचा 130 रनवर ऑलआऊट केला होता. ट्रेन्ट बोल्टने बांगलादेशच्या 4 विकेट घेतल्या होत्या, तर जेम्स नीशमला दोन विकेट मिळाल्या होत्या.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket news, New zealand

    पुढील बातम्या