न्युझीलँडमधला हा रेकॉर्ड मोडणं विराट- रोहितला अशक्य

न्युझीलँडमधला हा रेकॉर्ड मोडणं विराट- रोहितला अशक्य

एकदिवसीय क्रिकेट सामन्यात एका षटकात तब्बल ४३ धावा केल्या

  • Share this:

न्युझीलँडचे दोन फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी करत ए लिस्टमध्ये नवीन वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. स्थानिक एकदिवसीय क्रिकेट सामन्यात एका षटकात तब्बल ४३ धावा केल्या. हे वाचून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण हे खरंय. कीवी फलंदाजांनी ६ षटकार लगावत ४३ धावा केल्या.


न्युझीलँडमध्ये खेळण्यात आलेल्या सामन्यात जो कार्टर आणि ब्रेट हेम्पटन या दोन फलंदाजांनी अफलातून कामगिरी करत एकाच षटकात ४३ धावा केल्या. हेमिल्टन येथे खेळण्यात आलेल्या नॉर्दन डिस्ट्रीक्ट आणि सेंट्रल डिस्ट्रीक्ट या दोन संघांच्या सामन्या दरम्यान हा वर्ल्ड रेकॉर्ड झाला.
एका षटकात ६ षटकार


दक्षिण आफ्रिकेच्या जलदगती गोलंदाज विलेन लूडिकच्या एका षटकात न्युझीलँडच्या कार्टर आणि हेम्पटनने तडाखेबाद फलंदाजी केली. लूडिकच्या १० व्या षटकात कार्टर आणि हेम्पटनने ६ षटकार एक चौकार आणि एक धाव काढत ४३ धावा केल्या.


षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौकार लगावला. त्यानंतरचे दोन्ही चेंडू हे नो बॉल होते. या नो- बॉलवर दोन षटकार लगावण्यात आले. यानंतरच्या ४ चेंडबवर तीन षटकार आणि एक धाव काढण्यात आली. या मोठ्या षटकाच्या बळावर नॉर्दन डिस्ट्रीक्टने ७ गडी गमावत ३१३ धावा केल्या.
नॉर्दन डिस्ट्रीक्टने २५ धावांनी जिंकला सामना


डोंगराएवढ्या धावांचा पाठलाग करताना सेंट्रल डिस्ट्रीक्टच्या संघाला ९ गडी गमावत फक्त २८८ धावा करता आल्या. नॉर्दन डिस्ट्रीक्टच्या संघाने वर्ल्ड रेकॉर्ड करत २५ धावांनी हा सामना जिंकला. न्युझीलँडच्या स्थानिक संघाने केलेली ही कामगिरी भारतीय संघाचे दोन स्टार खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा मोडू शकतील की नाही हे तर येणारा काळच ठरवेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 7, 2018 05:18 PM IST

ताज्या बातम्या