सराव करतानाच कोसळला 26 वर्षीय जलद गोलंदाज, उपचारादरम्यान कॅन्सर झाल्याचे निदान

सराव करतानाच कोसळला 26 वर्षीय जलद गोलंदाज, उपचारादरम्यान कॅन्सर झाल्याचे निदान

ज्या गोलंदाजाच्या गोलंदाजीपुढे दिग्गज फलंदाजही संघर्ष करतात, आता त्याचेच आयुष्य संघर्षमय झाले आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर : वेगवान गोलंदाज ज्याच्याकडे स्विंग आणि स्पीड अशा कला आहेत. ज्याच्या गोलंदाजीपुढे दिग्गज फलंदाजही संघर्ष करतात, आता त्याचेच आयुष्य संघर्षमय झाले आहे. अवघ्या 26 वर्षीय जलद गोलंदाजाला कॅन्सर झाल्याचे समोर आले आहे. 26 वर्षीय न्यूझीलंडचा क्रिकेटपटू अँड्र्यू हेझलडिन (Andrew Hazeldine) असे या जलद गोलंदाजाचे नाव आहे. अँड्र्यू कॅन्टरबरी संघासाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतो आणि सप्टेंबर महिन्यात त्याला कॅन्सर झाल्याचे निर्दशनास आले. तेव्हापासून क्रिकेट सोडून सध्या हा गोलंदाज उपचार घेत आहेत.

अ‍ॅन्ड्र्यू हेझलडिनला हॉजकिन लिम्फोमा नावाचा कर्करोग आहे. या प्रकारच्या कर्करोगामध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. हा कर्करोग जसजसा पसरतो, तसतसे शरीरात संक्रमणास सामोरे जाण्याची शक्ती कमी होते. या प्रकारच्या कर्करोगात ताप, रात्री घाम येणे आणि वजन वेगाने कमी होते. केमोथेरपी किंवा स्टेम सेल ट्रान्सप्लांटद्वारे देखील याचा उपचार केला जातो. असे सांगितले जात आहे की हेझलडिनची पहिली स्टेज आहे, बरे होण्याची शक्यता जास्त आहे.

वाचा-मोठी बातमी! सामन्याच्या 3 दिवस आधी 3 भारतीय क्रिकेटपटू कोरोना पॉझिटिव्ह

कॅन्टरबरी क्रिकेट संघाने हेझलडिनच्या कर्करोगाबद्दल दुःख व्यक्त केले. कॅन्टरबरी क्रिकेटचे हाय-परफॉरमन्स मॅनेजर मार्टी क्रोय म्हणाले की हेझलेडिनसाठी ही कठीण वेळ आहे आणि या कठीण टप्प्यात कॅन्टरबरी टीम त्याच्यासह आणि हेझलडिनच्या कुटुंबासमवेत उभे आहे. कॅन्टरबरी क्रिकेट टीम हेझलडिनच्या उपचारात देखील मदत करेल.

वाचा-मोठी बातमी! सामन्याच्या 3 दिवस आधी 3 भारतीय क्रिकेटपटू कोरोना पॉझिटिव्ह

अँड्र्यू हेझलडिनची कारकीर्द

अँड्र्यू हेझलडिन डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे, जो कॅन्टरबरीसाठी 14 प्रथम श्रेणी सामने खेळला आहे. 2018 मध्ये कॅन्टरबरीकडून पदार्पण करणाऱ्या या वेगवान गोलंदाजानं 14 सामन्यांत 35 बळी घेतले आहे. तसेच, त्याने 16 लिस्ट A सामने खेळले आहेत. यात 21 विकेट घेण्याची कामगिरी केली आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: November 21, 2020, 11:06 AM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या