• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • पोट धरून हसाल; ओम प्रकाश मिश्रामुळे न्यूझीलंडने रद्द केला पाकिस्तान दौरा!

पोट धरून हसाल; ओम प्रकाश मिश्रामुळे न्यूझीलंडने रद्द केला पाकिस्तान दौरा!

न्यूझीलंड क्रिकेट टीमने पहिल्या वनडेच्या काही मिनिटं आधी पाकिस्तानचा दौरा रद्द (New Zealand Cancels Pakistan Tour) केला. या प्रकरणात आता ओम प्रकाश मिश्रा (Om Prakash Mishra) याचं नाव समोर येत आहे.

 • Share this:
  इस्लामाबाद, 23 सप्टेंबर : न्यूझीलंड क्रिकेट टीमने पहिल्या वनडेच्या काही मिनिटं आधी पाकिस्तानचा दौरा रद्द (New Zealand Cancels Pakistan Tour) केला. सुरक्षेचं कारण देत न्यूझीलंडने पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली, यापाठोपाठ इंग्लंडनेही पाकिस्तान दौऱ्यावर (England Cancels Pakistan Tour) न जाण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने सुरक्षेला नेमका कोणता धोका होता? याबाबत स्पष्टपणे काहीच सांगितलं नाही. पाकिस्तानचे सूचना मंत्री फवाद चौधरी (Fawad Chaudhary) यांनी मात्र भारतातून न्यूझीलंडला हा धमकीचा मेल पाठवण्यात आला, पण व्हीपीएनने मेल सिंगापूरहून आल्याचं दाखवलं, असा दावा केला. फवाद चौधरी यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये ओम प्रकाश मिश्रा (Om Prakash Mishra) याचंही नाव घेतलं. अजब पाकिस्तानचा गजब दावा, न्यूझीलंड सीरिज रद्द होण्याबद्दल लावलं महाराष्ट्र कनेक्शन! 'ज्या मोबाईलवरून धमकी पाठवण्यात आली तो ऑगस्ट 2019 ला लॉन्च करण्यात आला आणि 25 सप्टेंबरला ऍक्टिव्ह झाला. यावरून ओम प्रकाश मिश्रा नावाच्या व्यक्तीने मुंबईतून हमझा आफ्रिदीच्या नावाने फेक ई-मेल आयडी तयार केला आणि व्हीपीएनचा वापर करत सिंगापूर लोकेशन दाखवून धमकीचा मेल पाठवण्यात आला,' असं फवाद चौधरी म्हणाले. पत्रकार परिषदेमध्ये फवाद चौधरी यांनी काही फोटोही दाखवले, यातला एक फोटो ओम प्रकाश मिश्रा याचा होता. 2017 साली 'बोल ना आंटी आऊ क्या' या गाण्यानंतर ओम प्रकाश मेहरा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला, तसंच त्याचे मोठ्या प्रमाणावर मीम बनायलाही सुरुवात झाली. फवाद चौधरी यांच्या या पत्रकार परिषदेनंतर #OmPrakashMishra हा हॅशटॅग ट्रेण्ड व्हायला सुरुवात झाली. तसंच सोशल मीडिया युजर्सनी मोठ्या प्रमाणावर मीम्सही बनवायला सुरुवात केली. T20 World Cup : भारतच नाही, या दोन टीमही निशाण्यावर, पाकिस्तानचा इशारा!
  Published by:Shreyas
  First published: