IPL 2019 : बलात्कार प्रकरणी आरोप झालेल्या 'या' खेळाडूला धोनीनं दिली आपल्या संघात जागा

IPL 2019 : बलात्कार प्रकरणी आरोप झालेल्या 'या' खेळाडूला धोनीनं दिली आपल्या संघात जागा

याआधी चेन्नईचा जलद गोलंदाज लुंगी एंगीडीनं माघार घेतली होती, त्यानंतर आता चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू डेव्हिड व्हिलीनं मायदेशात परतण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Share this:

चेन्नई, 30 मार्च : आयपीएलच्या बाराव्या हंगामात दमदार सुरूवात करणाऱ्या चेन्नई संघानं आपले पहिले दोनही सामने जिंकले. चेन्नई संघाचा तिसरा सामना रविवारी आपल्या घरच्या मैदानावर राजस्थान विरोधात होणार आहे. पण यादरम्यान एक मोठी बातमी म्हणजे धोनीच्या संघानं बलात्कार प्रकरणात आरोपी राहिलेल्या एका खेळाडूला आपल्या संघात जागा दिली आहे. या खेळाडूचे नाव आहे, स्कॉट कुग्गेलैन. तो न्युझीलंडचा ऑलराऊंडर खेळाडू आहे. लुंगी एंगीडीनं दुखापतीमुळं आयपीएलमधून माघार घेतली होती, त्याच्याबदली स्कॉटला संघात स्थान देण्यात आले आहे. एंगीडीनंतर चेन्नईच्या आणखी एका विदेशी खेळाडूनं माघार घेतली आहे. चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू डेव्हिड व्हिलीनं मायदेशात परतण्याचा निर्णय घेतला आहे. व्हिलीच्या पत्नीनं दुसऱ्या मुलाला जन्म दिला आणि त्यामुळे त्याला मायदेशी परतावे लागले. तो आता आयपीएलच्य संपूर्ण सत्रात खेळणार नाही.

न्युझीलंड क्रिकेटमध्ये स्कॉट कुग्गेलैन हा चर्चेचा विषय ठरला होता. दरम्यान ऑकलंडमध्ये भारत विरोधात टी-20 सामना खेळत असताना, त्याच्या विरोधात #metoo चे पोस्टर लावण्यात आले होते.

स्कॉट कुग्गेलैन याच्यावर 2015 साली एका महिलेनं बलात्काराचा आरोप केला होता. दोन वर्षानंतर स्कॉटला निर्दोष घोषित केले होते, त्यानंतर त्याची सुटकाही करण्यात आली होती.

स्कॉट कुग्गेलैन याच्यावर 2015 साली एका महिलेनं बलात्काराचा आरोप केला होता. दोन वर्षानंतर स्कॉटला निर्दोष घोषित केले होते, त्यानंतर त्याची सुटकाही करण्यात आली होती.

काय आहे कुग्गेलैनचे प्रकरण

न्युझीलंडचा जलद गोलंदाज स्कॉट कुग्गेलैन याच्यावर 2015 साली एका महिलेनं बलात्काराचा आरोप केला होता. दोन वर्षानंतर स्कॉटला निर्दोष घोषित केले होते, त्यानंतर त्याची सुटकाही करण्यात आली होती. दरम्यान न्युझीलंडमध्ये या निकालाविरोधात अनेक मोर्चे निघाले. कुग्गेलैननं 4 टी-20 आणि 2 एकदिवसीय सामने खेळले आहेत.

VIDEO : बीडमधील गुंडगिरीच्या आरोपाबद्दल पहिल्यांदाच बोलल्या पंकजा मुंडे

First published: March 30, 2019, 11:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading