मुंबई, 20 मार्च : बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये न्यूझीलंडचा (New Zealand vs Bangladesh) 8 विकेटने विजय झाला आहे, याचसोबत किवींनी तीन मॅचच्या या सीरिजमध्ये आघाडी घेतली आहे. बांगलादेशची टीम 41.5 ओव्हरमध्ये 131 रनवर ऑल आऊट झाली. महमदुल्लाहने 54 बॉलमध्ये सर्वाधिक 27 रन केले. न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टीलने 19 बॉलमध्ये 38 रनची खेळी केली, यामध्ये 3 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. हेन्री निकोल्स 49 रनवर नाबाद राहिला, त्याने डेव्होन कोनवेसोबत दुसऱ्या विकेटसाठी 65 रनची पार्टनरशीप केली. डेवोन कोनवेने 27 रन केले.
न्यूझीलंडने या मॅचमध्ये टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. ट्रेन्ट बोल्टने (Trent Boult) मॅचच्या पहिल्याच बॉलवर आऊटस्विंग टाकून तमीम इकबालसमोर अडचणी निर्माण केल्या. बोल्टने 27 रन देऊन 4 विकेट घेतल्या. आयपीएलआधी (IPL 2021) मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) ही खुशखबरच म्हणावी लागेल, कारण बोल्ट मुंबईच्या टीमचा महत्त्वाचा खेळाडू आहे. मागच्या मोसमात बोल्टने मुंबईला मलिंगाची कमी जाणवून दिली नाही. याशिवाय मुंबईचाच ऑल राऊंडर जिमी नीशमनेही (James Neesham) चांगली बॉलिंग केली. नीशमने 27 रन देऊन 2 विकेट घेतल्या, तर मिचेल सॅन्टनरलाही 2 विकेट घेण्यात यश आलं.
काईल जेमिसन पुन्हा फ्लॉप
या मॅचमध्येही न्यूझीलंडचा फास्ट बॉलर काईल जेमिसन (Kyle Jamieson) पुन्हा एकदा अपयशी ठरला. 8 ओव्हरमध्ये त्याने 25 रन दिल्या, पण त्याला एकही विकेट घेता आली नाही. याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्येही जेमिसन फ्लॉप ठरला होता. आयपीएलच्या लिलावात जेमिसनवर 15 कोटी रुपयांची बोली लागली. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने (RCB) जेमिसनला विकत घेतलं. आता जेमिसनचा फॉर्म विराट कोहलीच्या आरसीबीसाठी चिंतेचा विषय असेल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 4 टी-20 मॅचमध्ये जेमिसनने 15 ओव्हर बॉलिंग करून 175 रन दिले होते. 11.66 च्या इकोनॉमी रेटने बॉलिंग करत जेमिसनला फक्त 1 विकेट मिळाली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, IPL 2021, Mumbai Indians