वेलिंग्टन, 09 नोव्हेंबर : क्रिकेटमध्ये कायमच विचित्र प्रकार घडत असतात. कधी विचित्र कॅच तर कधी बोल्ड. मात्र क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच एक खेळाडू चेंडूला हात आणि पाय लावल्यामुळे बाद झाला. न्यूझीलंडचा क्रिकेटपटू टॉम ब्लंडेलला (Tom Blundell) ऑब्सट्रक्टिंग द फील्ड (obstructing the field) प्रकरणार आऊट देण्यात आले. 24 तासांताआधी टॉमनं शतकी खेळी केली होती, त्यानंतर तो बाद झाला.
टॉमच्या विचित्र विकेटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बेसिन रिझर्व्ह मैदानावर टॉमनं जॅकब डफीच्या चेंडू स्टम्पच्या जवळ खेळला. चेंडू स्टम्पवर आदळणार तेव्हाच त्यानं चेंडूला पाय मारला, मात्र तरी चेंडू स्टम्प जवळ गेला, म्हणून त्यानं हातानं चेंडू हटवला. क्रिकेटच्या नियमानुसार, जर बॅटला लागून चेंडू स्टम्पवर लागत असेल तर फलंदाज पायानं चेंडू हटवू शकतो, मात्र हाताचा वापर करू शकत नाही. हाताचा वापर केल्यामुळे टॉम बाद झाला.
वाचा-1 6 W W Wd W 0! सहा चेंडूंनी बदललं श्रेयस अय्यरचं नशीब, पाहा VIDEO
WEIRD DISMISSAL KLAXON
Tom Blundell was dismissed for obstructing the field in the Plunket Shield!
Also, as an aside, can we just appreciate how many woolly hats are being worn... pic.twitter.com/hEhQfDIXl7
— The Googly (@officialgoogly) November 8, 2020
वाचा-उडी एकीनं मारली, कॅच दुसरीनं घेतला; महिला क्रिकेपटूचा हा VIDEO पाहून व्हाल शॉक
काय आहे नियम?
पहिल्या चेंडूवर हात लावल्यानंतर फलंदाजाला हॅंडल्ड द बॉल आऊट दिले जाते. मात्र 2017मध्ये यात बदल करण्यात आला. या अंतर्गत तर चेंडूला हात लावल्यानंतर फलंदाज ऑब्सट्रक्टिंग द फील्ड (obstructing the field) बाद होतो.