Home /News /sport /

IND vs ENG कसोटी सामन्यात अश्विनचं शतक आणि शिवाय 5 जणांचा बळी! दिग्गजांच्या विक्रमांना टाकलं मागे

IND vs ENG कसोटी सामन्यात अश्विनचं शतक आणि शिवाय 5 जणांचा बळी! दिग्गजांच्या विक्रमांना टाकलं मागे

IND Vs ENG: अश्विनच्या दिमाखदार कामगिरीमुळे आता थेट कपिल देव, इयान बॉथमच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. पाहा या अष्टपैलू खेळांडूचे विक्रम

    नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी  : भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना (Test Cricket Match) सध्या चेन्नईच्या (Chennai) चेपॉक स्टेडियमवर सुरू आहे. रविचंद्रन अश्विनच्या (Ravichandran Ashwin) अष्टपैलू खेळीमुळे (Allrounder) सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पाच बळी घेणाऱ्या अश्विनने तिसऱ्या दिवशी आपलं फलंदाजीचं कौशल्यही दाखवलं. त्याने कॅप्टन विराट कोहलीसोबत (Virat Kohli) महत्त्वाची भागीदारी करताना देशाला मोठी धावसंख्या उभारून दिली. त्यासोबतच त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. अश्विननं इंग्लंडच्या पहिल्या इनिंगमध्ये 43 रन देऊन पाच विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर भारताच्या दुसऱ्या इनिंगमध्ये अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीमध्ये बॅटिंग करताना 148 बॉलमध्ये 14 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीनं 106 रन काढले. पाच विकेट्स आणि 100 रन अशी ऑल राऊंड कामगिरी एकाच टेस्टमध्ये करण्याची अश्विनची ही तिसरी वेळ आहे. या यादीमध्ये इंग्लंडचा ऑल राऊंडर इयान बोथम हाच फक्त अश्विनच्या पुढे असून त्यानं हा पराक्रम पाच वेळेस केला आहे. याआधी ऑगस्ट 2017मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या कोलंबो येथील कसोटी सामन्याने त्याने अर्धशतक झळकावलं होतं. त्या वेळी या अष्टपैलू खेळाडूने 54 धावांची खेळी केली होती. आता अश्विनने घरच्या मैदानावर खेळताना पाच वर्षांनी 50पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. याआधी त्याचं भारतातलं अर्धशतक इंग्लंडविरुद्धच्या चेन्नईतल्या सामन्यातच झालं होतं. त्या वेळी त्याने 67 धावा केल्या होत्या. IND vs ENG : अश्विनच्या सेंच्युरीनंतर सिराजचं सेलिब्रेशन Viral, पाहा VIDEO अश्विन हा एकाच कसोटी सामन्यात 50 पेक्षा जास्त धावा करणं आणि पाचपेक्षा जास्त बळी मिळवणं अशी कामगिरी अनेकदा करणारा खेळाडू ठरला आहे. अश्विनने अशी कामगिरी आतापर्यंत सहा वेळा केली आहे. या बाबतीत त्याने भारताचे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनाही मागे टाकलं आहे. कपिल देव यांनी अशी कामगिरी चार वेळा केली होती. अशी कामगिरी रवींद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) चार वेळा, तर भुवनेश्वर कुमारने (Bhuvaneshwar Kumar) दोनदा केली आहे. त्याशिवाय आणखी 13 खेळाडूंनी अशी कामगिरी प्रत्येकी एकदा केली आहे. थेट इयान बॉशमशी तुलना एकाच कसोटी सामन्यात एका दिवशी पाच बळी आणि शिवाय धावांचं शतक असं करणारा खेळाडू म्हणून अश्विनचं नाव आता थेट इयान बॉथम या दिग्गजाबरोबर घेतलं जाऊ लागलं आहे. रिचर्ड हेडलीच्या विक्रमाशी बरोबरी- जगभरातल्या कसोटीपटूंशी तुलना करायची झाल्यास एकाच कसोटी सामन्यात 50 पेक्षा जास्त धावा करणं आणि पाचपेक्षा जास्त बळी मिळवणं अशी कामगिरी करण्याच्या बाबतीत अश्विन न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू खेळाडू रिचर्ड हॅडली (Richard Headley) याच्यासह संयुक्तरीत्या तिसऱ्या स्थानावर आहे. या यादीत इंग्लंडचा माजी अष्टपैलू खेळाडू इयान बॉथम (Ian Botham) पहिल्या, तर बांगलादेशचा माजी अष्टपैलू खेळाडू शकीब-उल-हसन (Shakib ul hasan) दुसऱ्या स्थानावर आहे. अशी कामगिरी इयानने 11 वेळा, तर शकीबने नऊ वेळा केली आहे. वेस्ट इंडीजच्या माल्कम मार्शलने (Malcom Marshall) अशी कामगिरी पाच वेळा केली आहे. तसंच, कपिल देव, रवींद्र जाडेजा आणि न्यूझीलंडचा ख्रिस केर्न्स यांनी ही कामगिरी प्रत्येकी चार वेळा केली आहे. आणखीही एक अनोखा विक्रम- ऑफस्पिनर बॉलर असलेल्या आर. अश्विनने चेन्नईत सध्या सुरू असलेल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीही एक विक्रम केला होता. अश्विनने घेतलेल्या पाच बळींपैकी बेन स्टोक्स, मोईन अली, स्टुअर्ट ब्रॉड हे तिघे जण डावखुरे फलंदाज आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये डावखुऱ्या 200 फलंदाजांना आउट करणारा पहिलाच गोलंदाज बनण्याचा विक्रम आर. अश्विनच्या नावावर झाला आहे. तसंच, एकाच कसोटी सामन्यात पाच बळी घेण्याची कामगिरी आर. अश्विनने करण्याची ही 29वी वेळ आहे. भारताची अवस्था 6 आऊट 106 अशी असताना अश्निन बॅटींगला आला आणि त्याने घरच्या ग्राउंडवर खेळताना कमाल केली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल गाठण्यासाठी दोन्ही टीमसाठी ही टेस्ट अत्यंत महत्त्वाची आहे. या मालिकेत सध्या इंग्लंड 1-0 अशा आघाडीवर आहे. आता इंग्लंडला ही टेस्ट जिंकण्यासाठी 482 रनचं अवघड टार्गेट पूर्ण करावं लागणार आहे. चेन्नई टेस्टचे अजून दोन दिवस बाकी आहे. त्यामुळे इंग्लंडकडे वेळ भरपूर आहे. मात्र स्पिनला मदत करणाऱ्या पिचवर इंग्लंडचे बॅट्समन आणखी किती काळ तग धरणार हा खरा प्रश्न आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Cricket news, R ashwin

    पुढील बातम्या