IPL 2019 : धोनीच्या संघात सामिल होऊ शकतो 'हा' स्पेशल खेळाडू, VIDEO व्हायरल

IPL 2019 : धोनीच्या संघात सामिल होऊ शकतो 'हा' स्पेशल खेळाडू, VIDEO व्हायरल

सध्या निश्चिंत असलेला चेन्नईचा संघ विजयासाठी धडपडणाऱ्या राजस्थान विरोधात आज भिडणार आहे.

  • Share this:

चेन्नई, 11 एप्रिल : यंदाच्या आयपीएलमध्ये धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जनं दमदार कामगिरी केली आहे. चेन्नईचा संघ सहा पैकी पाच सामने जिंकत सध्या अंकतालिकेत अव्वल क्रमांकावर आहे.

चेन्नईनं प्ले-ऑफसाठी आपलं स्थान जवळजवळ निश्चित केलं आहे. त्यामुळं सध्या निश्चिंत असलेला चेन्नईचा संघ विजयासाठी धडपडणाऱ्या राजस्थान विरोधात आज भिडणार आहे.

दरम्यान, अतिप्रचंड फॅन असलेल्या चेन्नईच्या संघासाठी ही Yellow army कुठंही जाऊ शकते. चेन्नईच्या संघाला पाठिंबा देण्यासाठी चेन्नईचे फॅन्स कुठेही जाऊ शकतात. कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या झालेल्या सामन्यात एक असाच चिमुकला फॅन पाहायला मिळाला. त्यानं तर चक्क चेन्नईकडून मला खेळायचे आहे, अशी इच्छा एका कार्डवर लिहली होती.

चेन्नईचा संघ सध्या अंकतालिकेत अव्वल क्रमांकावर आहे. आज राजस्थान आपल्या घरच्या मैदानात चेन्नईला हरवण्याचा प्रयत्न करतील. एकीकडं महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात या संघात कुठल्याही मैदानावर कुठल्याही परिस्थितीत विजय मिळवून देणाऱ्या खेळाडूंचा भरणा आहे. राजस्थान मात्र संघर्ष करीत असून, स्पर्धेत कायम राहण्यासाठी संघाला उर्वरित सर्वच सामने जिंकावे लागणार आहेत.

आतापर्यंत राजस्थाच्या एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आलेली नाही. याउलट चेन्नई अधिक बलाढ्य वाटतो. धोनीसह शेन वाटसन व फाफ डुप्लेसिस, सुरेश रैना, अंबाती रायुडू व केदार जाधव हेही धावा काढण्यात योगदान देत आहेत. सवाई मानसिंग स्टेडियमच्या संथ खेळपट्टीवर सुपरकिंग्सचे गोलंदाज पुन्हा एकदा वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न करतील.

VIDEO: उमेदवाराने चक्क ईव्हीएमच जमिनीवर आदळलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 11, 2019 06:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading