महाराष्ट्राची कुस्ती पोचणार जगभरात

७ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर, २०१८ या कालावधीत ही लीग पुण्यातील बालेवाडी स्टेडियमवर होणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 29, 2018 06:03 PM IST

महाराष्ट्राची कुस्ती पोचणार जगभरात

मुंबई, 29 आॅगस्ट : कुस्ती चॅम्पियन्स लीग - अपना बंदा खेल जंदाची अधिकृत घोषणा करण्यात आली. ‘कलर्स मराठी’ वाहिनी या लीगचे ब्रॉडकास्टिंग पार्टनर असणार असून ‘रेडिओ सिटी ९१.१ FM’ रेडिओ पार्टनर असणार आहे. या लीगमुळे महाराष्ट्रातल्या खेळाडूंचा खेळ जगभरात पोहोचायला मदत होणार असून ‘कुस्ती’ या आपल्या खेळाचा अधिक प्रसार होण्यास मदत होणार आहे. शिवाय, इतर खेळांप्रमाणे कुस्तीलाही व्यवसायिक स्वरूप प्राप्त होण्यासही मदत होणार आहे. ‘महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद’ आणि ‘MWCL Sports LLP’ मिळून होणाऱ्या या ‘कुस्ती चॅम्पियन्स लीग’चे थेट प्रक्षेपण ‘कलर्स मराठी’ वाहिनी आणि ‘वुट’वरून केलं जाणार आहे. ७ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर, २०१८ या कालावधीत ही लीग पुण्यातील बालेवाडी स्टेडियमवर होणार आहे.

या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना ‘कुस्ती चॅम्पियन्स लीग’चे फाउंडर आणि प्रमोटर पुष्कराज केळकर म्हणाले की, '२०२०च्या ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या कुस्तीगिरांनी चमकदार कामगिरी करून त्यांचे सामर्थ्य जगाला दाखवून द्यावे यासाठी खेळाडूंना या लीगच्या अनुभवाचा फायदा व्हावा, हे सगळ्यात मोठे ध्येय समोर ठेवून आम्ही चालत आहोत. महाराष्ट्रातल्या सहा शहरांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सहा टीम या लीगमध्ये असणार आहेत. एकुण ७२ खेळाडू खेळणार आहेत. लीग रंगतदार असणार हे नक्की.'

या लीगमध्ये एकूण ६ टीम खेळणार असून प्रत्येक टीममध्ये ८ मुले आणि ४ मुली असे १२ खेळाडू सहभागी होतील. लीगमधील एकुण खेळाडूंची संख्या ७२ असेल. महाराष्ट्रभरातील ३०० खेळाडूंमधून लिलावाच्या माध्यमातून या ७२ खेळाडूंची निवड करण्यात येईल. या लीगमध्ये मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर या शहरांच्या टीमचा समावेश असेल.

टीमची नावं

रणयोध्दा मुंबई

Loading...

जिगरबाज नाशिक

कोल्हापूर शाहू

जांबाज औरंगाबाद

नरवीर नागपूर

झुंजार पुणे

स्लॅब कोसळणारा तो थरारक VIRAL VIDEO कुठला ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 29, 2018 05:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...