कपिल देवचं आयुष्य मोठ्या पडद्यावर

कपिल देवचं आयुष्य मोठ्या पडद्यावर

हा सिनेमा फॅन्टम प्रॉडक्शन्स प्रदर्शित करू शकतात.पण अजून तरी या सिनेमाची अधिकृत घोषणा झालेली नाही.

  • Share this:

1 ऑगस्ट: सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिक बनवण्याचा ट्रेन्ड आला आहे. आता यातच एका नवीन बायोपिकची भर पडणार आहे. कबीर खानचा ट्युबलाईट भलेही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नसेल पण आता कबीर खान भारताला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या कपिल देवच्या आयुष्यावर एक सिनेमा बनवतोय.

या सिनेमात कपिल देवच्या भूमिकेत रणवीर सिंग दिसण्याची शक्यता आहे.याच सिनेमासाठी नुकतीच रणवीर सिंगने कपिल देवची भेट घेतली.लवकरच या सिनेमाची घोषणा करणार असल्याचंही म्हटलं जातंय. आणि हा सिनेमा फॅन्टम प्रॉडक्शन्स प्रदर्शित करू शकतात.पण अजून तरी या सिनेमाची अधिकृत घोषणा झालेली नाही.

1983च्या वर्ल्ड कपवर बेतलेला हा सिनेमा प्रेक्षकांना आरामात सिनेमा घरांकडे खेचू शकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 1, 2017 02:23 PM IST

ताज्या बातम्या