News18 Lokmat

IPL 2019 : तब्बल 9 वर्षांनंतर RCBसाठी पुन्हा खेळणारा ‘हा’ खेळाडू

प्ले ऑफमध्ये प्रवेश करायचा असल्याच विराट कोहलीला आपले उर्वरीत सर्व सामने जिंकावे लागणार आहेत.

News18 Lokmat | Updated On: Apr 19, 2019 08:25 PM IST

IPL 2019 : तब्बल 9 वर्षांनंतर RCBसाठी पुन्हा खेळणारा ‘हा’ खेळाडू

कोलकाता, 19 एप्रिल : आठ पैकी सात सामने हरल्यानंतर आयपीएलमधलं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचं आव्हान संपुष्टात आलं आहे. तरी कोलकाता विरुद्धचा सामना त्यांच्यासाठी करो वा मरोचा सामना असणार आहे. दरम्यान या सामन्यात मिस्टर 360 या नावानं ओळखला जाणारा एबी डीव्हिलियर्स दुखापतीमुळं सामना खेळणार नाही आहे.

सध्या RCBला जर प्ले ऑफमध्ये पोहचायचे असल्यास त्यांना आता सर्व सामने जास्त धावांच्या फरकानं जिंकणे गरजेचे झाले आहे. त्यासाठी विराटनं अखेर आपल्या एका हुकुमी अस्त्राला बाहेर काढले आहे. आरसीबीच्या ताफ्यात 9 वर्षांनी पुन्हा एकदा साऊथ आफ्रिकेचा जलद गोलंदाज डेल स्टेनचं आगमन झालं आहे.स्टेन बऱ्याच काळानंतर पुन्हा पदार्पण करत आहे. त्यामुळं विराटच्या त्याच्याकडून अपेक्षा जास्त आहेत. डेल स्टेन साऊथ आफ्रिकेसाठी कसोटी सामन्यात सर्वात जास्त विकेट घेणारा गोलंदाज आहे. तर, स्टेन टी-20 सामन्यातल्या आपला शतकी आकडा पार करण्यासाठी सज्ज आहे. दरम्यान गुरुवारी स्टेननं नेटमध्ये कसुन सराव केला.

Loading...

RCBसाठी युजवेंद्र चहल वगळता कोणताही गोलंदाज चांगली गोलंदाजी करु शकला नाही. तर जलद गोलंदाजीमध्ये उमेश यादव विशेष चांगली कामगिरी करु शकलेला नाही.  दरम्यान RCBनं आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ टाकला आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात डेल स्टेन गोलंदाजीचा कोच आशिष नेहरा यांच्या समोर गोलंदाजीचा सराव करताना दिसला. या व्हिडिओमध्ये डेल स्टेन आपल्या पुर्वीच्याच जोशात दिसत आहे.दरम्यान, आरसीबीला उर्वरित सर्व सामने जिंकावे लागणार आहे. एवढंच नाही तर त्यांना हा विजय मोठ्या फरकाने मिळवावा लागेल. त्याशिवाय इतर संघांच्या कामगिरीवर त्यांचा प्लेऑफचा प्रवेश होणार की नाही ते ठरणार आहे. प्ले ऑफसाठी केकेआरला सहापैकी किमान चार सामने जिंकणे गरजेचे आहे. त्यापैकी तीन सामने ईडन गार्डनवर खेळले जातील.


VIDEO : बारामतीच्या सभेत अमित शहांनी मागितला पवारांकडे हिशेब, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 19, 2019 08:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...