VIDEO : न्यू बॉल प्लीज, लिनने मारलेला षटकार चहल बघतच राहिला

VIDEO : न्यू बॉल प्लीज, लिनने मारलेला षटकार चहल बघतच राहिला

ख्रिस लिनने मारलेला षटकार इतका उंच होता की चेंडू स्टेडियमच्या बाहेर गेला.

  • Share this:

बेंगळुरु, 05 एप्रिल : आरसीबीने दिलेल्या 206 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरच्या सलामीवीरांनी चांगली सुरूवात केली. पहिल्याच षटकात 17 धावा काढल्या. दुसऱ्या षटकातील 5 व्या चेंडूवर उंच फटका मारण्याच्या नादात सुनिल नरेन झेलबाद झाला. त्यानंतर रॉबीन उथप्पा मैदानात आला. ख्रिस लिनने एका बाजूने फटकेबाजी करत 31 चेंडूत 4 चौकार आणि दोन गगनचुंबी षटकारांच्या सहाय्याने 43 धावा केल्या. त्याला नेगीने त्रिफळाचित केलं.

ख्रिस लिन बाद होण्यापूर्वी आरसीबीचा गोलंदाज युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर त्याने मारलेला षटकार सर्वांनाच तारे दाखवणारा ठरला. इतका उंच फटका मारला की चेंडू स्टेडियमच्या बाहेर गेला. यावेळी चहलला बघत राहण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नव्हता.

तत्पूर्वी, चिन्नास्वामी स्टेडियमवर एबी डिव्हिलियर्स आणि विराट कोहलीच्या वादळी खेळीच्या जोरावर आरसीबीने केकेआरला 206 धावांचे आव्हान दिलं. कोलकाता नाइट रायडर्सने नाणेफेक जिंकून गुणतक्त्यात शेवटच्या क्रमांकावर असलेल्या आरसीबीला प्रथम फलंदाजीला पाचारण केलं. प्रथम फलंदाजीला आलेल्या आरसीबीचा कर्णधार विराट कोहली आणि पार्थिव पटेल यांनी सुरुवातीपासूनच फटकेबाजी केली. दोघांनी 7.5 षटकांत 64 धावांची भागिदारी केली. नितीश राणाने पार्थिव पटेलला पायचित करून ही जोडी फोडली. त्याने 24 चेंडूत 25 धावा केल्या. या बळावर आरसीबीने 20 षटकांत 3 बाद 205 धावा केल्या.

पार्थिव पटेलनंतर मैदानात आलेल्या एबी डीव्हिलियर्सने कोहलीसोबत तुफान फटकेबाजी केली. दोघांनी 108 धावांची भागिदारी केली. कोहलीने 49 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारासह 84 धावा केल्या. त्याला कुलदीप यादवने स्वत:च्याच गोलंदाजीवर झेल घेत बाद केले. दुसऱ्या बाजूला डिव्हीलियर्सने 32 चेंडूत 63 धावा केल्या. यात त्याच्या 5 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. विराटनंतर फलंदाजीला आलेल्या मार्कस स्टोइनसने 13 चेंडूत 28 धावा केल्या.

First published: April 5, 2019, 11:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading