नीता अंबानींनी केलं रिलायन्स फाऊंडेशनच्या फुटबॉल स्पर्धेचं उद्घाटन

नीता अंबानींनी केलं रिलायन्स फाऊंडेशनच्या फुटबॉल स्पर्धेचं उद्घाटन

या फुटबॉल स्पर्धेत पुढच्या पाच महिन्यांत, जवळपास 3 हजार शैक्षणिक संस्थातील 60 हजार मुलं सहभागी होणार आहेत.

  • Share this:

कोची, 17ऑगस्ट: रिलायन्स फाऊंडेशनच्या युथ स्पोर्ट्स अंतर्गत होणाऱ्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामाला कोचीमध्ये बुधवारी सुरुवात झाली आहे. रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी आणि भारतीय फुटबॉल टीमचा स्ट्रायकर सी.के.विनीथ यांच्या उपस्थितीत या स्पर्धेला सुरुवात झाली.

देशातल्या 30 शहरांमध्ये ही स्पर्धा खेळली जाणार आहे. फुटबॉलसाठी मुलभूत सुविधा आणि वातावरण निर्मितीचा रिलायन्स फाऊंडेशनचा प्रयत्न आहे. त्या अंतर्गत होणाऱ्या या फुटबॉल स्पर्धेत पुढच्या पाच महिन्यांत, जवळपास 3 हजार शैक्षणिक संस्थातील 60 हजार मुलं सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा चार गटांमध्ये घेण्यात येईल.

ज्युनियर बॉईज, सीनियर बॉईज, कॉलेज बॉईज आणि सीनियर गर्ल्स असे हे चार गट आहेत. 30 शहरांमध्ये या चार गटांत प्रिक्वॉलिफाईंग राऊंड होणार आहे. या राऊंडमध्ये जिंकणारे संघ नॅशनल चॅम्पियनशीपसाठी खेळतील. ही स्पर्धा मागच्या वर्षी 8 शहरांमध्ये खेळवण्यात आली होती. भारतात फुटबॉल आणि इतर खेळ रूजावे आणि भारतातील तरुणांना प्रोत्साहन मिळावं यासाठी रिलायन्स फाऊंडेशन कार्यरत असल्याचं नीता अंबानी यांनी यावेळी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 17, 2017 01:25 PM IST

ताज्या बातम्या