• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • Olympic चा गोल्डन बॉय नीरज चोप्राची खेल रत्नसाठी शिफारस, 11 खेळाडूंचा समावेश

Olympic चा गोल्डन बॉय नीरज चोप्राची खेल रत्नसाठी शिफारस, 11 खेळाडूंचा समावेश

टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) भारताला गोल्ड मेडल मिळवून देणाऱ्या भालाफेकपटू नीरज चोप्राची (Neeraj chopra) मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कारासाठी (khel Ratna) शिफारस करण्यात आली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर : टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) भारताला गोल्ड मेडल मिळवून देणाऱ्या भालाफेकपटू नीरज चोप्राची (Neeraj chopra) मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कारासाठी (khel Ratna) शिफारस करण्यात आली आहे. राष्ट्रीय खेल पुरस्कार समितीने भारताच्या सर्वोच्च क्रीडा पुरस्कारांसाठी खेळाडूंच्या नावाची शिफारस केली. नीरजशिवाय टोकयो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या रवी दहिया, पीआर श्रीजेश आणि लवलीना बोरगोहोई यांची नावंही या यादीत सामील आहेत. भारताची अनुभवी महिला क्रिकेटपटू मिताली राज (Mithali Raj) आणि फूटबॉलपटू सुनील चेत्री (Sunil Chhetri)यांच्या नावाचीही खेल रत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. 2021 हे वर्ष भारतीय खेळाडूंसाठी खास होतं. ऑलिम्पिकसह पॅरालिम्पिकमध्येही भारतीय खेळाडूंनी धमाकेदार कामगिरी केली. पॅरालिम्पिकमध्ये पहिल्यांदाच दोन पदकं जिंकणाऱ्या अवनी लेखराच्या नावाचीही शिफारस करण्यात आली आहे. याशिवाय पॅरालिम्पिकमध्ये एफ64 मध्ये गोल्ड मेडल जिंकणाऱ्या सुमित अंतिल याचंही नाव खेल रत्नसाठी देण्यात आलं आहे. याशिवाय 35 भारतीय खेळाडूंची नावं अर्जुन पुरस्कारासाठी देण्यात आली आहेत. या 11 खेळाडूंना खेल रत्न मिळण्याची शक्यता नीरज चोप्रा (एथलेटिक्स), रवी दहिया (कुस्ती), पीआर श्रीजेश (हॉकी), लवलीना बोर्गोहेन (बॉक्सिंग), सुनील छेत्री (फूटबॉल), मिताली राज (क्रिकेट), प्रमोद भगत ( पॅरा बॅडमिंटन), सुमित अंतिल (पॅरा भाला फेक), अवनी लेखरा (पॅरा शूटिंग), कृष्णा नगर ( पॅरा बॅडमिंटन), एम नरवाल (पॅरा शूटिंग) अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस योगेश कथुनिया (डिस्कस थ्रो), निषाद कुमार (हाय जम्प), प्रवीण कुमार (हाय जम्प), शरद कुमार (हाय जम्प), सुहास एलवाई (पॅरा बॅडमिंटन), सिंहराज अंधाना (शूटिंग), भाविना पटेल (पॅरा टेबल टेनिस), हरविंदर सिंह (तीरंदाजी), शिखर धवन (क्रिकेट) छेत्री पहिला फूटबॉलपटू दिग्गज फूटबॉलपटू सुनील छेत्री खेल रत्न पुरस्कारासाठी शिफारस झालेला पहिला फूटबॉलपटू आहे. मागच्या वर्षी पाच खेळाडूंना खेल रत्न पुरस्कारांसाठी निवडण्यात आलं होतं. 2016 रियो ऑलिम्पिकनंतर चार खेळाडूंना या पुरस्कारासाठी निवडण्यात आलं होतं.
  Published by:Shreyas
  First published: