मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /बदल केला नाही तर वनडे क्रिकेट संपेल? सचिनने दिला 25-25चा सल्ला

बदल केला नाही तर वनडे क्रिकेट संपेल? सचिनने दिला 25-25चा सल्ला

सचिन तेंडुलकर

सचिन तेंडुलकर

एकदिवसीय क्रिकेटला आता 25-25 षटकांच्या चार सत्रात विभागलं पाहिजे असं मत सचिनने व्यक्त केलं. याशिवाय एकदिवसीय क्रिकेटमधील सध्याच्या नियमांवरही सचिनने प्रश्न उपस्थित केले.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 18 मार्च : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटच्या भविष्याबाबत मोठं विधान केलं आहे. सचिनने म्हटलं की, नव्या चेंडूचा वापर, क्षेत्ररक्षणातील निर्बंध हे एकदिवसीय क्रिकेटला कठीण बनवत आहेत. यामुळे बॅट, बॉल यांच्यातलं संतुलन बिघडत आहे. एकदिवसीय क्रिकेटला आता 25-25 षटकांच्या चार सत्रात विभागलं पाहिजे असं मत सचिनने व्यक्त केलं. याशिवाय एकदिवसीय क्रिकेटमधील सध्याच्या नियमांवरही सचिनने प्रश्न उपस्थित केले.

सचिनने म्हटलं की, एकदिवसीय क्रिकेट कंटाळवाणे होत आहे यात काही शंका नाही. याचे दोन भाग आहेत ते म्हणजे एक सध्याचे स्वरुप आणि दुसरं असं आपण काही बदलायला हवं. 50 षटकांच्या खेळात दोन नवे चेंडू असतात. जेव्हा तुमच्याकडे दोन नवे चेंडू असतात तेव्हा रिव्हर्स स्वींग संपते. आपण खेळाच्या 40 व्या षटकात असलो तरी प्रत्यक्षात तो त्या चेंडूचं 20वे षटक असते.

एकदिवसीय क्रिकेटला कसोटीप्रमाणेच 4 सत्रात विभागलं पाहिजे. कसोटी क्रिकेटमध्ये तुमच्याकडे 20 विकेट असतात, इथे फक्त दहा. तुम्ही 25 षटकात बाद झालात तर उरलेल्या 25 षटकांसाठी पुन्हा तुम्ही फलंदाजी करू शकत नाही असंही सचिनने म्हटलं.

IND vs AUS : स्मिथ अन् मार्शच्या कृतीने पांड्या संतापला, पंचांजवळ व्यक्त केली नाराजी

श्रीलंकेतील एका स्पर्धेचं उदाहरण देताना सचिन म्हणाला की,श्रीलंकेत आम्ही एक स्पर्धा खेळली होती. 118 षटके कोणत्याही निकालाशिवाय खेळ झाला. सुरुवातीच्या दिवशी श्रीलंकेने फलंदाजी केली आणि आम्ही 10 षटके खेळलो. सामना पावसामुळे रद्द झाला आणि पुढच्या दिवशीही सामना होऊ शकला नव्हता.

तुमच्याकडे 15 षटके असीतल आणि दुसरा संघ 25 षटके फलंदाजी करत असेल तर दोन्ही संघांचा किमान 25-25 षटकांचा खेळ होईल. आता खेळाचा अंदाज लावता येतो. 15 व्या ते 40 व्या षटकापर्यंत काही हालचाल नसते. आपण दवाचा मुद्दा कसा हातळणार आहे? एखादा कर्णधार नाणेफेक गमावल्यानंतर ओल्या मैदानावर गोलंदाजी करायची असते आणि ते खूप कठीण असतं असंही सचिनने म्हटलं.

मी काही फिरकीपटूंशी बोललो. मी आत 5 क्षेत्ररक्षकांना उभा करण्यावरून त्यांची मानसिकता समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. गोलंदाज म्हणतात की त्यांना लेंथ-लाइन बदलण्याचं स्वातंत्र्य नाही. फलंदाज चूक करण्याची शक्यता असते पण लाइन मध्ये बदल केला तर महागात पडू शकतं. सध्याच्या परिस्थितीत त्यांच्याकडे अद्याप तशी सुरक्षितता नाही. आत पाच क्षेत्ररक्षक आणि दोन नवे चेंडू हे आव्हानात्मक असल्याचं सचिनने सांगितलं.

First published:

Tags: Cricket, Sachin tendulkar