टीम इंडियाची विजयी घोडदौड कायम, लंकेचा केला 93 धावांनी पराभव

भारताने लंकेला 93 धावांनी लोळवत टी-20 इतिहासातला सर्वात मोठा विजय मिळवलाय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 20, 2017 11:04 PM IST

टीम इंडियाची विजयी घोडदौड कायम, लंकेचा केला 93 धावांनी पराभव

20 डिसेंबर : कटक इथं पहिल्या टी-20 सामन्यात भारताने श्रीलंकेचा डंका वाजवत दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने लंकेला 93 धावांनी लोळवत टी-20 इतिहासातला सर्वात मोठा विजय मिळवलाय.

भारताने प्रथम फलंदाजी करत लंकेपुढे 181 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताकडून राहुल लोकेशने शानदार अर्धशतकी खेळी केली होती. राहुलने 48 चेंडुमध्ये 7 चौकार आणि 1 षटकार लगावत 61 धावा केल्यात. महेंद्र सिंग धोनीने 39 धावांची इनिंग पेश करत भारताचा स्कोअर वाढवला.

181 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या लंकनं टीमने भारतीय गोलंदाजापुढे नांगी टाकली. अवघ्या 16 षटकांत अवघा संघ 87 धावांवर गारद झाला.  भारताकडून यजुवेंद्र चहलने सर्वाधिक 4 गडी बाद करून लंकनं टीमला सुरुंग लावला.

हार्दिक पंड्याने 29 धावा देत 3 गडी बाद केले. कुलदीप यादवने 2 तर जयदेव उनाडकटला एक बळी मिळाला. चहलनं चार विकेट घेत आफगानीस्थानच्या रशीदचा विक्रम मोडला. चहलन 2017 च्या वर्षभरात 19 बळी घेतले आहेत. रशीदच्या नावावर वर्षभरात 17 बळी आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 20, 2017 11:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...