मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs WI : टीम इंडियासमोर खडतर पेपर, 4 अवघड प्रश्नांची शोधावी लागणार उत्तरं

IND vs WI : टीम इंडियासमोर खडतर पेपर, 4 अवघड प्रश्नांची शोधावी लागणार उत्तरं

 तीन वन-डेंच्या सीरीजमध्ये इंग्लंडवर विजय मिळवल्यानंतर आता टीम इंडियाचं पुढचं लक्ष्य वेस्ट इंडिज असणार आहे. या शुक्रवारपासून भारत आणि वेस्ट इंडिजच्या दरम्यान 3 वनडे क्रिकेट मॅचचीसीरिज सुरु होत आहे.

तीन वन-डेंच्या सीरीजमध्ये इंग्लंडवर विजय मिळवल्यानंतर आता टीम इंडियाचं पुढचं लक्ष्य वेस्ट इंडिज असणार आहे. या शुक्रवारपासून भारत आणि वेस्ट इंडिजच्या दरम्यान 3 वनडे क्रिकेट मॅचचीसीरिज सुरु होत आहे.

तीन वन-डेंच्या सीरीजमध्ये इंग्लंडवर विजय मिळवल्यानंतर आता टीम इंडियाचं पुढचं लक्ष्य वेस्ट इंडिज असणार आहे. या शुक्रवारपासून भारत आणि वेस्ट इंडिजच्या दरम्यान 3 वनडे क्रिकेट मॅचचीसीरिज सुरु होत आहे.

मुंबई, 20 जुलै-   तीन वन-डेंच्या सीरीजमध्ये इंग्लंडवर विजय मिळवल्यानंतर आता टीम इंडियाचं पुढचं लक्ष्य वेस्ट इंडिज असणार आहे. या शुक्रवारपासून भारत आणि वेस्ट इंडिजच्या दरम्यान 3 वनडे क्रिकेट मॅचचीसीरिज सुरु होत आहे. वर्कलोड मॅनेजमेंटनुसार या सीरिजमधून टीमचा कॅप्टन रोहित शर्मा , विराट कोहली, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या  आणि जसप्रीत बुमराह  या सीनिअर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. के. एल. राहुलची नुकतीच स्पोर्ट्स हार्नियाची सर्जरी  झाली आहे आणि तो अजूनही पूर्णपणे बरा झालेला नाही. त्यामुळे तो या वन-डे सीरीजमध्ये खेळू शकणार नाही. अशा परिस्थितीत आता ज्या खेळाडूंना एरवी संधी मिळत नाही त्यांना स्वत:ला सिद्ध करण्याची संधी आहे. या स्पर्धेसाठी टीममध्ये कोणाला कशी संधी द्यायची आणि कोणत्या ऑर्डरमध्ये म्हणजे क्रमांकावर कोणाला खेळवायचं याबद्दल नीट विचार करून निर्णय घ्यावा लागणार आहे.कोच राहुल द्रविड आणि वन-डे सीरिजसाठी कॅप्टन म्हणून निवड झालेल्या शिखर धवनपुढे  मोठं आव्हान असणार आहे. या दोघांपुढील मुख्य चार प्रश्न हे आहेत.

प्रश्न 1- धवनबरोबर कोण करणार ओपनिंग?

ईशान किशनला भारतीय टीम मॅनेजमेंट फर्स्ट चॉईस ओपनर आणि विकेटकीपर म्हणून संधी देण्याचा विचार करत आहे. या आधीच्या ईशान किशन वन-डे सीरिज खेळू शकला नव्हता. टॉप ऑर्डरमध्ये रोहितचा जोडीदार म्हणून शिखर धवनचं कमबॅक झालं होतं. अर्थात रोहितच्या गैरहजेरीत ओपनिंग कुणी करायचं असा प्रश्न विचारला तर सगळ्यांत जास्त पसंती ईशानला दिली जात आहे. जर किशनने कॅप्टन धवनसोबत ओपनिंग करून डावाची सुरुवात केली तर भारताकडे टॉप ऑर्डरमध्ये दोन डावखुरे बॅट्समन असतील. भारतीय टीम मॅनेजमेंटला लेफ्ट-राईट असा प्रयोग करायचा असेल तर मग ऋतुराज गायकवाडआणि शुभमन गिल यांच्यापैकी कुणालातरी एकाला संधी दिली जाऊ शकते.

ऋतुराज गायकवाडला वन-डेचा अनुभव नाही-

ऋतुराज गायकवाडने आतापर्यंत एकही आंतरराष्ट्रीय वन-डे खेळलेली नाही. मात्र स्थानिक क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी चांगली आहे. 63 सामन्यांमध्ये त्यानं 100 च्या स्ट्राईक रेट आणि 55 च्या सरासरीने रन केले आहेत. 2021 मध्ये ऋतुराजने विजय हजारे ट्रॉफी या देशांतर्गत वन-डे टूर्नामेंटमध्ये महाराष्ट्रासाठी 4 शतकं ठोकून 603 रन्स केले होते. त्याचा स्ट्राईक रेट 113 होता.

तर दुसरीकडे शुभमनही टीममध्ये परतला आहे. तो आतापर्यंत तीन वन-डे मॅचेस खेळला आहे. डिसेंबर 2020 मध्ये तो या पूर्वीची वन-डे खेळला होता. तो त्याचा शेवटचा लिस्ट-ए सामनाही होता. त्यामुळे त्याचा 50 ओव्हर फॉरमॅटमधील सध्याच्या मॅचेसचा सराव नाही. तसंच तो 18 महिन्यांनंतर टीममध्ये परतला आहे. गिल नुकतंच IPL टी-20 क्रिकेट स्पर्धेमध्ये गुजरात टायटन्सकडून ओपनिंग बॅट्समन म्हणून खेळला होता. त्यावेळेस ओपनिंग बॅट्समन म्हणून त्यानं 132.32 च्या स्ट्राईक रेटनं त्यानं 483 रन्स केले होते. त्यामुळे धवनबरोबर ओपनिंग बॅट्समन म्हणून कोणाला निवडायचं असा मोठा प्रश्न भारतीय टीम मॅनेजमेंटसमोर पडू शकतो.

प्रश्न 2- मिडल ऑर्डरमध्ये कोण असेल?

वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे सीरिजमध्ये मीडल ऑर्डर कशी असेल हाही एक मोठा प्रश्न आहे. कोणत्या खेळाडूंना यामध्ये द्यायची? धवन आणि कोच द्रविडला या प्रश्नांचीही उत्तरं शोधावी लागणार आहेत. मिडल ऑर्डरमध्ये सूर्यकुमार यादवला संधी मिळू शकते. तर उरलेल्या दोन-तीन स्लॉटमध्ये श्रेयस अय्यर, दीपक हुडा, संजू सॅमसन  आणि कदाचित शुभमन गिल यांच्यामध्ये चुरशीची स्पर्धा असेल.

अय्यरच्या फॉर्मची चिंता

श्रेयस अय्यर गेल्या वर्षापासून खांद्याच्या दुखापतीमुळे बराच काळ मैदानापासून लांब राहिलाहोता. टीममध्ये परतल्यानंतर त्याची कामगिरी फारशी चांगली झाली नव्हती. अय्यरला शॉर्ट बॉल खेळता येत नाही हा त्याचा वीकनेस बहुतेक सगळ्या टीम्सना कळला आहे. त्यामुळे लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये मीडल ऑर्डरमध्ये त्याला सूर्यकुमार यादवची चांगली टक्कर आहे. श्रेयस इंग्लंडविरुद्ध 3 वन-डेच्या सीरिजमधील फक्त पहिलीच मॅच खेळला होता. त्यानंतर कोहलीमुळे प्लेईंग-XI मध्ये त्याला जागा मिळाली नव्हती. आता विराट कोहलीलाच विश्रांती देण्यात आल्याने श्रेयसला तीन नंबरवर बॅटिंगची संधी मिळू शकते.

हे वाचा: भारतीय क्रिकेटरांच्या नावावरील हे विक्रम मोडणे जवळपास अशक्य! लागोपाठ 21 ओवर टाकलेत मेडन )

सॅमसननं आतापर्यंत फक्त एकच वन-डे मॅच खेळली आहे. गेल्यावर्षी श्रीलंकेविरुद्ध वनडेमध्ये त्यानं पदार्पणातच 46 रन्स केले होते. पण त्याच्या बॅटिंगमध्ये सातत्य नसल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. मात्र त्याला सतत खेळण्याची संधीही मिळालेली नाही. नुकतंच आयर्लंडच्या दौऱ्यात त्याने एका टी-20 मॅचमध्ये 42 बॉल्समध्ये 77 रन्स केले होते. त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या या वन-डे सीरिजमध्ये संधी मिळाली तर त्याचं सोनं करण्यासाठी तो नक्कीच उत्सुक असेल.

प्रश्न 3- भारताकडे किती ऑलराउंडर आहेत?

दीपक हुडाने या वर्षीच्या सुरुवातीलाच वेस्ट इंडिजच्या विरुद्धच मीडल ऑर्डर बॅट्समनच्या रुपाने वन-डेमध्ये पदार्पण केलं होतं. तेव्हापासून तो मर्यादित षटकांच्या ओव्हरमधील टीम इंडियाचा भाग आहे. या वर्षीच्या आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जाएंट्ससाठी 451 रन्स त्याने केले होते. बहुतेक वेळा दीपक हुडा नंबर 3 वर खेळायला येतो. नुकतंच त्याने आयर्लंडविरुद्धही याच नंबरवर खेळून टी-20 मध्ये शतकही ठोकलं होतं.हुडा खालच्या नंबरवर येऊन महत्त्वाची भूमिका बजावू शकतो

हार्दिक आणि पंतला वेस्ट इंडिजविरुद्धच्या या वन-डे सीरिजमध्ये विश्रांती देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत, हुडा खालच्या नंबरवर येऊन रवींद्र जडेजा किंवा अक्षर पटेल यांच्यापैकी कोणाबरोबर महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. हुडा ऑफ स्पिन बॉलिंगही करतो. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याचा इकॉनॉमी रेट 4.45 आहे. सीम बॉलिंग ऑलरांउंडरच्या रुपात शार्दुल ठाकूर हा एकमेव पर्याय आहे.

हे वाचा: IND vs WI: एकाच दिवसात वेस्ट इंडिजचे दोन दिग्गज निवृत्त, अचानक घेतलेल्या निर्णयामुळे चाहतेही हैराण )

प्रश्न 4- भारताचा पेस ॲटॅक कसा असेल?

वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन-डे सीरिजमध्ये आपली खालची बॅटिंग ऑर्डर मजबूत करण्यासाठी रवींद्र जडेजाला नंबर 7 आणि शार्दुल ठाकूरला नंबर 8 वर खेळवलं जाऊ शकतं. फर्स्ट चॉईस स्पिनर म्हणून युजवेंद्र चहलला पसंती दिली जाऊ शकते. अशात स्पेशालिस्ट फास्ट बॉलर्ससाठी फक्त दोनच स्लॉट उरतात. त्यासाठी मोहम्मद सिराजला सगळ्यात जास्त प्राधान्य असेल. तर उर्वरित एका स्लॉटसाठी आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा आणि अर्शदीप सिंह यांच्यापैकी एका बॉलरची निवड करावी लागणार आहे. अर्शदीप दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या वन-डे सीरिजमध्ये खेळू शकला नव्हता. तर प्रसिद्ध 3 मॅचेसमध्ये केवळ 2 विकेट्सच घेऊ शकला होता. प्रसिद्ध आणि आवेश दोघांच्या बॉलिंगला वेग आहे आणि बॅटिंगसाठी चांगल्या पीचमधूनही ते चांगला बाऊन्स मिळवू शकतात. त्यामुळे दुसरा फास्ट बॉलर म्हणून या दोघांपैकी एका फास्ट बॉलरला टीम मॅनेजमेंट संधी देऊ शकते.एकूणच, टीम इंडियाच्या नव्या दमाच्या या खेळाडूंकडून भरपूर अपेक्षा आहेत. आपली निवड सार्थ करण्यासाठी हे खेळाडू मिळालेल्या संधीचं सोनं करतील का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

First published:

Tags: Cricket, Cricket news, Test cricket