Home /News /sport /

राहुल द्रविड एनसीएमध्ये तयार करतोय डावखुरा ओपनर, लवकरच टीम इंडियामध्ये संधी

राहुल द्रविड एनसीएमध्ये तयार करतोय डावखुरा ओपनर, लवकरच टीम इंडियामध्ये संधी

एकीकडे भारतीय बॅटिंग ऑस्ट्रेलियामध्ये (India vs Australia) संघर्ष करत असताना दुसरीकडे राहुल द्रविड (Rahul Dravid) एनसीए (NCA) मध्ये नवीन डावखुरा बॅट्समन तयार करत आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार राहुल द्रविड एनसीएमध्ये देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) याला प्रशिक्षण देत आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 21 डिसेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) ची दुसरी टेस्ट मॅच मेलबर्नमध्ये होणार आहे. ऍडलेडमध्ये झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर बॉक्सिंग डे टेस्टमध्ये भारतीय टीममध्ये मोठे बदल होऊ शकतात. एकीकडे भारतीय बॅटिंग ऑस्ट्रेलियामध्ये संघर्ष करत असताना दुसरीकडे राहुल द्रविड (Rahul Dravid) एनसीए (NCA) मध्ये नवीन डावखुरा बॅट्समन तयार करत आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार राहुल द्रविड एनसीएमध्ये देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) याला प्रशिक्षण देत आहे. टाईम्स ऑफ इंडियामध्ये आलेल्या वृत्तानुसार एनसीएमध्ये युवा क्रिकेटपटूंना टेस्ट क्रिकेटसाठी तयार करण्यावर जोर दिला जात आहे. त्यामुळे पुढच्या दोन सीरिजमध्ये युवा खेळाडूला टीममध्ये संधी दिली जाऊ शकते. ऋषभ पंत आणि पृथ्वी शॉ यांना बऱ्याच संधी देण्यात आल्या, पण त्यांनी निराशाजनक कामगिरी केली. पण पुढच्या वर्षी इंग्लंडविरुद्ध भारतात होणाऱ्या सीरिजसाठी दोघांना आणखी एक संधी दिली जाऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कर्णधार विराट कोहलीने मंगळवारी भारतात परत यायच्या आधी टीमसोबत बातचित केली आणि उरलेल्या सीरिजसाठी खेळाडूंना प्रोत्साहन दिलं. त्यातच एनसीएमध्ये राहुल द्रविड देवदत्त पडिक्कलला बॅकअप ओपनर म्हणून तयार करत आहे. आयपीएलमध्ये उल्लेखनीय कामगिरी देवदत्त पडिक्कलने आयपीएलच्या या मोसमात (IPL 2020) उल्लेखनीय कामगिरी केली. बंगळुरूने पार्थिव पटेलऐवजी देवदत्त पडिक्कलला एरॉन फिंचसोबत ओपनिंगला पाठवलं आणि त्यानेही विराटची निराशा केली नाही. पडिक्कलने 15 मॅचमध्ये 124.80 च्या सरासरीने 473 रन केले, यामध्ये पाच अर्धशतकांचा समावेश आहे. ऍडलेडमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा लाजिरवाणा पराभव झाला. दुसऱ्या इनिंगमध्ये भारतीय टीम फक्त 36 रनवर ऑल आऊट झाली. टेस्ट क्रिकेटमधला भारताचा हा सगळ्यात कमी स्कोअर होता. यानंतर भारताच्या बॅटिंगवर चौफेर टीका होत आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या