कधी 200 रुपयांसाठी केली टेनिस बॉलनं गोलंदाजी आता दिसणार थेट ब्लू जर्सीत!

भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर 3 ऑगस्टपासून जाणार आहे. यात तीन टी 20, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळले जातील.

News18 Lokmat | Updated On: Jul 22, 2019 08:27 PM IST

कधी 200 रुपयांसाठी केली टेनिस बॉलनं गोलंदाजी आता दिसणार थेट ब्लू जर्सीत!

नवी दिल्ली, 22 जुलै : ICC Cricket World Cup नंतर भारतीय संघ आता वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठीच्या संघाची घोषणा करण्यात आली. बीसीसीआयच्या निवड समितीने रविवारी मुंबईत पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी संघ जाहीर केला. भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर 3 ऑगस्टपासून जाणार आहे. यात तीन टी 20, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळले जातील. दौऱ्याची सुरुवात टी 20 मालिकेपासून होणार आहे. त्यानंतर एकदिवसीय मालिका 8 ऑगस्ट तर कसोटी मालिका 22 ऑगस्टला सुरू होणार आहे.

दरम्यान या मालिकेत टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत दिल्लीच्या एका युवा गोलंदाजाला संघात स्थान दिले आहे. आयपीएलमध्ये बंगळुरूकडून खेळणारा नवदीप सैनीनं पहिल्याच सामन्यातच शेन वॉटसन सारख्या दिग्गज खेळाडूला टक्कर दिली. 151च्या वेगानं गोलंदाजी करणाऱ्या या खेळाडूनं आयपीएलमध्येच सर्वांचे लक्ष वेधले. दरम्यान रणजीमध्ये दिल्लीकडून खेळणारा सैनी हा मुळचा हरियाणाचा आहे. आपल्या करिअरच्या सुरुवातीला सैनी 200 रुपये प्रति सामन्याच्या हिशोबानं सामना खेळायचा. 2013पर्यंत तर सैनी लेदर बॉलने नाही तर चक्क टेनिस बॉलनं सराव करायचा. त्यामुळं त्याचा हा प्रवास पाहता, भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी सैनीला खडतर प्रयत्न करावे लागले.

वाचा-INDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक?

गौतम गंभीरनं केले होते गोलंदाजीचे कौतुक

रणजी स्पर्धेत दिल्ली संघाकडून खेळणाऱ्या सैनीची माजी कर्णधार गौतम गंभीरनं तारिफ केली होती. 2013-14मध्ये रणजी संघासाठी निवड झाली होती. दरम्यान 2017-18 दिल्लीला अंतिम फेरीत पोहचवण्यासाठी सैनीनं महत्त्वाची भूमिका होती. 8 सामन्यात त्यानं 34 विकेट घेतल्या होत्या.

Loading...

वाचा-INDvsWI : विंडीज दौऱ्यानं विराटची झोप उडवली, विश्रांती नाहीच!

कसोटी मालिकेतून केले होते पदार्पण

सैनीनं 2018मध्ये अफगाणिस्तान विरोधात झालेल्या कसोटी सामन्यात पदार्पण केले होते. त्यावेळी गंभीरनं सैनीच्या गोलंदाजीची तारिफ केली होती. यावेळी गंभीरनं, हा खेळाडू टीम इंडियात नक्की जागा मिळणारा असे भाकित केले होते.

वाचा- World Cup च्या संघातून रायडुला का वगळले? निवड समितीच्या प्रमुखांनी केला खुलासा

VIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: team india
First Published: Jul 22, 2019 04:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...