• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup : विराट बघत राहिला, पण काहीच करू नाही शकला, लागोपाठ तीन 'वर्ल्ड कप'मध्ये एकाच गोष्टीने घात केला

T20 World Cup : विराट बघत राहिला, पण काहीच करू नाही शकला, लागोपाठ तीन 'वर्ल्ड कप'मध्ये एकाच गोष्टीने घात केला

यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाची (Team India) कामगिरी निराशाजनक झाली. न्यूझीलंडने अफगाणिस्तानला 8 विकेटने धूळ चारली आणि भारताचं आव्हान संपुष्टात आलं. याचसह विराटचं (Virat Kohli) ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं.

 • Share this:
  दुबई, 7 नोव्हेंबर : यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाची (Team India) कामगिरी निराशाजनक झाली. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध दारूण पराभव झाल्यानंतर भारताने अफगाणिस्तान आणि स्कॉटलंडवर दणदणीत विजय मिळवला, पण तरीही पहिल्या दोन पराभवांमुळे टीमचं मोठं नुकसान झालं, ज्यामुळे सेमी फायनलला पोहोचण्याचं त्यांचं स्वप्न भंगलं. टीम इंडियाच्या सेमी फायनलच्या प्रवेशासाठी रविवारी अफगाणिस्तानने न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवणं गरजेचं होतं, पण ते शक्य झालं नाही. न्यूझीलंडने अफगाणिस्तानला 8 विकेटने धूळ चारली आणि भारताचं आव्हान संपुष्टात आलं. याचसह विराटचं (Virat Kohli) ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं. विराट कोहलीने आतापर्यंत चार आयसीसी ट्रॉफींमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व केलं. यात 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी, 2019 वर्ल्ड कप, 2021 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल आणि टी-20 वर्ल्ड कपचा समावेश आहे. या चारही स्पर्धांमध्ये टीम इंडियाला विजय मिळवता आला नाही. अखेरच्या तीन स्पर्धांमध्ये तर निसर्गानेच विराट कोहली आणि टीम इंडियाचा घात केला. धुक्याचा टीम इंडियाला फटका पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाचा 10 विकेटने तर न्यूझीलंडविरुद्ध 8 विकेटने पराभव झाला. या दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली टॉस हरला आणि भारताला पहिले बॅटिंग करावी लागली. युएईमध्ये या काळात रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर धुकं पडतं, ज्यामुळे दुसऱ्या इनिंगमध्ये बॉलरना बॉल पकडण्यात अडचण येते, तसंच बॅटिंग टीमसाठी खेळपट्टी सोपी होऊन जाते. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाला दुसऱ्यांदा बॉलिंग करायला लागली, ज्यामुळे टीमचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. विराट कोहलीनेही या दोन सामन्यांनंतर टॉसचं महत्त्व सांगितलं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये पावसाचा कहर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्येही (WTC Final) पावसाचा खेळ पाहायला मिळाला. या सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे होऊ शकला नाही. तसंच बराच काळ ढगाळ वातावरण राहिलं. टीम इंडियालाही बराच काळ ढगाळ वातावरणातच बॅटिंग करावी लागली, ज्याचा फायदा न्यूझीलंडच्या स्विंग बॉलिंगला झाला, ज्यामुळे न्यूझीलंडने वर्ल्ड चॅम्पियनशीप ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. वर्ल्ड कप सेमी फायनलमध्येही पाऊस 2019 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्येही (2019 World Cup Semi Final) पावसाचा खेळ पाहायला मिळाला, ज्यामुळे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातली सेमी फायनल दोन दिवस चालली. न्यूझीलंडच्या टीमला स्वस्तात रोखल्यानंतर दुसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या बॅटिंगला सुरुवात झाली, पण आदल्या दिवशी पडलेल्या पावसामुळे पुन्हा एकदा न्यूझीलंडच्या स्विंग बॉलिंगला मदत झाली आणि टीम इंडियाचा 18 रनने पराभव झाला.
  Published by:Shreyas
  First published: