• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • पहिले गोळीबारात मृत्यू झाल्याची बातमी, मग कुस्तीपटू निशा दहिया थेट जगासमोरच आली, VIDEO

पहिले गोळीबारात मृत्यू झाल्याची बातमी, मग कुस्तीपटू निशा दहिया थेट जगासमोरच आली, VIDEO

हरियाणाच्या सोनीपतची राष्ट्रीय कुस्तीपटू निशा दहिया ( Wrestler Nisha Dahiya) हिची गोळी मारून हत्या करण्यात आल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं, पण या प्रकरणात नवा ट्वीस्ट समोर आला, जेव्हा खुद्द नेहा दहियाच जगासमोर आली.

 • Share this:
  सोनीपत, 10 नोव्हेंबर : हरियाणाच्या सोनीपतची राष्ट्रीय कुस्तीपटू निशा दहिया ( Wrestler Nisha Dahiya) हिची गोळी मारून हत्या करण्यात आल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं, पण या प्रकरणात नवा ट्वीस्ट समोर आला, जेव्हा खुद्द नेहा दहियाच जगासमोर आली. नेहा दहियाचा एक व्हिडिओ रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने प्रसिद्ध केला. या व्हिडिओमध्ये नेहा आपण जीवंत असल्याचं सांगितलं आहे. मी सध्या गोंडामध्ये सिनियर नॅशनल खेळण्यासाठी आले आहे. मी व्यवस्थित असून माझ्या मृत्यूच्या बातम्या चुकीच्या आहेत, असं निशा दहिया या व्हिडिओमध्ये म्हणाली आहे. निशाच्या या व्हिडिओमध्ये भारताची ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिकही आहे. दुसरीकडे साक्षी मलिकनेही निशाला काहीही झालं नसून, ती बातमी खोटं असल्याचं ट्वीट केलं. काय होतं प्रकरण? हल्लेखोरांनी निशाशिवाय तिचा भाऊ आणि आईवरही गोळीबार केला. या हल्ल्यात निशा आणि तिच्या भावाचा मृत्यू झाला, तर तिच्या आईची प्रकृती गंभीर आहे. निशाच्या आईवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असं वृत्त प्रसिद्ध झालं होतं, पण स्वत: नेहाच जगासमोर आल्यामुळे ही बातमी खोटी असल्याचं निष्पन्न झालं.
  Published by:Shreyas
  First published: