मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

National T20 Cup : पाकिस्तानच्या बाबर आझमचा 'तोल' ढासळला, मैदानातल्या कृत्याचा VIDEO

National T20 Cup : पाकिस्तानच्या बाबर आझमचा 'तोल' ढासळला, मैदानातल्या कृत्याचा VIDEO

 पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) शांत क्रिकेटपटूंपैकी एक समजला जातो. अनेकवेळा बाबर आझम मैदानातल्या आपल्या भावना बॅटिंगमधून प्रकट करतो, पण नॅशनल टी-20 कपमध्ये बाबर आझमचा तोल ढासळला.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 4 ऑक्टोबर : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) शांत क्रिकेटपटूंपैकी एक समजला जातो. अनेकवेळा बाबर आझम मैदानातल्या आपल्या भावना बॅटिंगमधून प्रकट करतो, पण नॅशनल टी-20 कपमध्ये (National T20 Cup) बाबर आझमचा तोल ढासळला. संतापलेल्या बाबरने खेळपट्टीवरच जोरात बॅट आपटली. नॉर्दन पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात इमाद वसीमच्या बॉलिंगवर रन काढता न आल्यामुळे बाबरला राग आला. बाबर आझमचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सामन्यात बाबरने शतक केलं, तरीही त्याच्या टीमने हा सामना गमावला.

मॅचच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये इमाद वसीमने टाकलेला बॉल बाबरला नीट खेळता आला नाही. तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल इमाद वसीमने बाबरच्या पायाच्या दिशेने टाकला. हा सोपा बॉल बाबरला खेळता आला नाही, त्यामुळे त्याला राग आला. बाबरचं मैदानातलं हे कृत्य पाहून कॉमेंटेटरनाही हसू आवरलं नाही.

" isDesktop="true" id="613178" >

बाबरचं शतक

सेन्ट्रल पंजाबचा कर्णधार असलेल्या बाबर आझमने या सामन्यात शतक केलं. 63 बॉलमध्ये त्याने नाबाद 105 रन केले. बाबरच्या या खेळीमध्ये 11 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. आझमच्या या शतकामुळे सेन्ट्रल पंजाबने 200 रनचा टप्पा गाठला. तरीही बाबरच्या टीमला पराभव पत्करावा लागला. हैदर अलीने 53 बॉलमध्ये नाबाद 91 रन केले आणि आपल्या टीमला 2 बॉल आधीच विजय मिळवून दिला.

बाबर आझम नॅशनल टी-20 कपमध्ये सर्वाधिक रन करणारा खेळाडू आहे. 6 इनिंगमध्ये त्याने 71.50 च्या सरासरीने 286 रन केले. यामध्ये एक शतक आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. बाबरचा स्ट्राईक रेटही 143 पेक्षा जास्तचा आहे.

T20 World Cup पूर्वी बाबर आझमनं वाढवलं टीम इंडियाचं टेन्शन, गेल आणि विराटला टाकलं मागं

First published:

Tags: Babar azam, Pakistan