National Sports Day 2019 and Khel Ratna Awards : राष्ट्रपतींकडून दिग्गज खेळाडूंचा सन्मान, वाचा कोणाला मिळाला कोणता पुरस्कार!

National Sports Day 2019 and Khel Ratna Awards : राष्ट्रपतींकडून दिग्गज खेळाडूंचा सन्मान, वाचा कोणाला मिळाला कोणता पुरस्कार!

राष्ट्रपतींच्या हस्ते एकूण 32 मान्यवरांचा गौरव करण्यात आला.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 ऑगस्ट : राष्ट्रीय खेळ दिवसाचे औचित्य साधत आज राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राजीव गांधी खेल रत्न, द्रोणाचार्य पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार, अर्जुन पुरस्कार आणि ध्यानचंद पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते एकूण 32 मान्यवरांचा गौरव करण्यात आला.

यातील 32 मान्यवरांमध्ये आशियाई व राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि पॅरा अॅथलिट दीपा मलिक यांचाही समावेश होता. तसेच, 6 द्रोणाचार्य पुरस्कार, 5 ध्यानचंद पुरस्कार व जीवनगौरव पुरस्कार व 19 खेळाडूंना अर्जुन पुरस्कारानं गौरव करण्यात आला. यात भारतीय क्रिकेटपटू रविंद्र जडेजाच्या नावाचाही समावेश होता. दरम्यान जडेजा आणि पुनिया यांना पुरस्कार वितरण समारंभात भाग घेता आला नाही. यावेळी पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार विजेत्या दीप मलिकचा राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारानं सन्मान करण्यात आला.

अशी असते प्रत्येक पुरस्काराच्या बक्षिसाची रक्कम

खेलरत्न पुरस्कार मिळालेल्या दीपा मलिक आणि बजरंग पुनिया यांना सात लाख पन्नसा हजार रुपयांचे बक्षिस देण्यात आले. तसेच, खेळात सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूला 10 लाख तर, अर्जुन, द्रोणाचार्य आणि ध्यानचंद पुरस्कार विजेत्यांना पाच-पाच लाख रुपये प्रत्येकी रक्कम दिली जाते.

पुरस्कार विजेते

राजीव गांधी खेल रत्न - बजरंग पुनिया ( कुस्ती) व दीपा मलिक ( पॅरा अॅथलिट)

द्रोणाचार्य पुरस्कार - विमल कुमार ( बॅडमिंटन), संदीप गुप्ता ( टेबल टेनिस), मोहिंदर सिंग ढिल्लोन ( अॅथलिट)

जीवनगौरव पुरस्कार - मेर्झबान पटेल ( हॉकी), रंबीर सिंग खोक्कर ( कबड्डी), संजय भरद्वाज ( क्रिकेट)

अर्जुन पुरस्कार - तजिंदरपाल सिंग तूर ( अॅथलिट), मोहम्मद अनास याहीया ( अॅथलिट), एस भास्करन ( बॉडीबिल्डींग), सोनिया लाथेर ( बॉक्सिंग), रवींद्र जडेजा ( क्रिकेट), चिंग्लेनसाना सिंग कंगुजान ( हॉकी), अजय ठाकूर ( कबड्डी), गौरव सिंग गिल ( मोटर स्पोर्ट्स), प्रमोद भगत ( पॅरा स्पोर्ट्स बॅडमिंटन), अंजुम मुदगील ( शूटींग), हरमित राजुल देसाई ( टेबल टेनिस), पूजा धांडा ( कुस्ती), फॉदा मिर्झा ( इक्वेस्टेरियन), गुरप्रीत सिंग संधू ( फुटबॉल), पूनम यादव ( क्रिकेट), स्वप्ना बर्मन ( अॅथलिट), सुंदर सिंग गुर्जर ( पॅरा अॅथलिट), बी साई प्रणित ( बॅडमिंटन), सिमरन सिंग शेरगिल ( पोलो)

ध्यानचंद पुरस्कार - मॅन्युएल फ्रेडीक्स ( हॉकी), अरुप बसाक ( टेबल टेनिस), मनोज कुमार ( कुस्ती), नितीन किर्तने ( टेनिस), सी. लाल्रेमसंगा ( तिरंदाजी)

'क्रिकेटचा देव' पोहोचला त्यांच्या भेटीला आणि कॅरमही खेळला, पाहा हा VIDEO

Published by: Akshay Shitole
First published: August 29, 2019, 9:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading