• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • क्रीडा जगतात खळबळ, भारताच्या 2 खेळाडूंची गोळी मारून हत्या

क्रीडा जगतात खळबळ, भारताच्या 2 खेळाडूंची गोळी मारून हत्या

पंजाबमध्ये दोन राष्ट्रीय खेळाडूंची गोळी मारून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

 • Share this:
  पाटियाला, 20 फेब्रुवारी : पंजाबमध्ये दोन राष्ट्रीय खेळाडूंची गोळी मारून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भारताचा हॉकीपट्टू आणि व्हालिबॉलपटूवर बुधवारी रात्री गोळीबार झाला. यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे क्रीडा जगताला धक्का बसला आहे. पंजाबमधील पाटियाला इथं हा प्रकार झाला. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार भारताचा राष्ट्रीय हॉकीपट्टू अमरिक सिंग आणि त्याचा साथीदार व्हॉलीबॉलपट्टू सिमरनजीत सिंग बुधवारी पटियाला इथल्या एका ढाब्यावर डिनर करत होता. तिथं त्यांची दुसऱ्या एका गटाशी वादावादी झाली. वादानंतर अज्ञातांनी दोन्ही खेळाडूंवर गोळीबार केला. अमरिक आणि त्याचा मित्र सिमरनजीत यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मध्यरात्री एकच्या सुमारास झाली. हल्लेखोरांनी दोघांच्या डोक्यात गोळी मारली. अमरिक आणि सिमरनजीर दोघेही पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये काम करत होते. घटनास्थळावर रक्ताचा सडा पडला होता. घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत. वाचा : खेळाडूनं पत्नी आणि 3 मुलांना कारमध्ये बंद करून जिवंत जाळलं, नंतर केली आत्महत्या दोन्ही खेळाडूंवर गोळीबार हा त्यांच्याच साथीदाराने मुलाच्या मदतीने केल्याचं म्हटलं जात आहे. दोघांमध्ये काहीतरी कारणामुळे वाद झाला होता. त्यानंतर मारहाणीचे प्रकारही झाले. शेवटी रागाच्या भरात बाप-लेकाने मिळून दोन्ही खेळाडूंवर गोळीबार केला असल्याची माहिती मिळते. याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा : ‘Mother from another Brother...’, 'पाकिस्तानी खेळाडूच्या ट्वीटमुळे MEMES चा पाऊस
  Published by:Suraj Yadav
  First published: