'पांड्या, मी नेहमी तुझ्यासोबत', वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अभिनेत्री झाली भावूक

'पांड्या, मी नेहमी तुझ्यासोबत', वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अभिनेत्री झाली भावूक

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याचा शुक्रवारी वाढदिवस होता. त्यानिमत्त पांड्याला अभिनेत्रीने दिलेल्या शुभेच्छानंतर अफेअरची चर्चा.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर : भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या सध्या उपचार घेत आहे. शुक्रवारी त्याचा वाढदिवस असल्याने अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या. क्रिकेट आणि सिनेमा जगतातील दिग्गजांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. यामध्ये एक मॉडेल आणि अभिनेत्री नताशा स्टानकोविच हिने दिलेल्या शुभेच्छांची चर्चा जोरदार रंगली आहे. सार्बियन वंशाची असेल्या या अभिनेत्रीनं इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत हार्दिक पांड्याला शुभेच्छा दिल्या आहेत. हार्दिकनेदेखील यानंतर तिचं आभार मानलं.

काही दिवसांपूर्वी हार्दीक पांड्या आणि नताशा यांच्यात अफेअर असल्याची चर्चा होती. दोघे लवकरच लग्नही करणार असं म्हटलं जात होतं. हार्दिक पांड्यानं नताशाची कुटुंबीयांशी भेटही घालून दिली होती. त्याशिवाय मुंबईत एका पार्टीमध्ये दोघेही उपस्थित होते. तेव्हा मोठा भाऊ कृणाल आणि त्याची पत्नी पंखुडी यांची नताशासोबत भेट घालून दिली होती. त्यामुळे दोघांच्या लग्नाची चर्चा होत आहे.

नताशाने हार्दिक पांड्याला शुभेच्छा देताना म्हटलं की, माझा सर्वात चांगला दोस्त, सर्वात खंबीर आणि सुंदर असा मित्र. हे वर्ष तुझ्यासाठी खडतर होतं. काही चांगल्या तर काही वाइट गोष्टी घडल्या पण त्यातूनही तु स्वत:ला सावरलं. तु आम्हा सर्वांसाठी एक प्रेरणा आहेस आणि तु तुझ्या आणि जवळच्या लोकांसाठी जे केलं आहेस त्याचा अभिमान बाळगणंसुद्धा कमी पडेल. आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या-वाइट घटनानंतरही तु पुन्हा उभा राहिलास आणि विजेत्यासारखा बाहेर पडलास. तू योग्य मार्गावर आहेस आणि तुझं ध्येय कायम ठेव. मी नेहमीच तुझ्यासोबत आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक पांड्या.

सार्बियाची असलेली नताशा 'डीजे वाले बाबू' या गाण्यात दिसली होती. त्यानंतर अनेक गाणी तिने केली. बिग बॉसच्या 8 व्या हंगामातही ती होती. त्याशिवाय नच बलिये मध्ये ती आधीचा प्रियकर अली गोनीसोबत सहभागी झाली होती.

SPECIAL REPORT: तळकोकणातील राजकीय शिमग्यात मुख्यमंत्र्यांची उडी?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 12, 2019 10:24 AM IST

ताज्या बातम्या