Home /News /sport /

VIDEO: हार्दिकची पत्नी नताशासह इशान-अय्यरची समुद्रात मजामस्ती, Beach Vibes एंजॉय करतायंत खेळाडू

VIDEO: हार्दिकची पत्नी नताशासह इशान-अय्यरची समुद्रात मजामस्ती, Beach Vibes एंजॉय करतायंत खेळाडू

natasa stankovic

natasa stankovic

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) पत्नी नताशा स्टानकोविच नेहमी तिच्या बोल्ड अंदाजामुळे चर्चेत पाहायाला मिळत असते.

    नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर: टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) पत्नी नताशा स्टानकोविच (Hardik wife, natasa stankovic) नेहमी तिच्या बोल्ड अंदाजामुळे चर्चेत पाहायाला मिळत असते. आताही ती पुन्हा याच कारणास्तव चर्चेत आली आहे. विशेष म्हणजे नताशासोबत युवा खेळाडू इशान किशन (Ishan Kishan) आणि श्रेयस अय्यरदेखील (shreyas iyer) चर्चेत आली आहेत. कारण व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये नताशा युवा खेळांडूसोबल धमाल मस्ती करताना दिसत आहे. नताशाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती दुबईच्या समुद्रात जेट स्की चालवत मजा करताना दिसत आहे. या व्हिडीमध्येच भारतीय खेळाडू इशान किशन आणि श्रेयस अय्यर दोघेही जेट स्की चालवत असून ते मध्येच समुद्रात उड्या मारताना दिसत आहेत.
    याआधी मंगळवारी नताशा स्टॅनकोविक तिचा मुलगा अगस्त्यसोबत स्विमिंग पूलमध्ये मस्ती करताना दिसली होती. मात्र, यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) टीम इंडियाने अत्यंत खराब प्रदर्शन केल्यामुळे त्यांना सेमीफायनलपूर्वीच स्पर्धेबाहेर जावं लागलं आहे. त्यामुळे, नेटकऱ्यांनी तिच्या पोस्टवर नाराजी व्यक्त केली आहे. वर्ल्ड कपमध्ये स्पर्धेत भारताचा स्टार अष्टपैैलू खेळाडू हार्दीक पंड्या (Hardik Pandya) याला अनेक संधी देण्यात आल्यानंतरही तो खास छाप सोडू शकला नाही. त्यामुळे स्पर्धेनंतर त्याची खराब वेळ सुरु झाली असून आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यांसाठी हार्दीकला संघात स्थान देण्यात आलेलं नाही.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    पुढील बातम्या