गिलॉन्ग, 16 ऑक्टोबर: ऑस्ट्रेलियात टी20 वर्ल्ड कपचं बिगुल वाजलंय. आजपासून टी20 वर्ल्ड कपच्या क्वालिफाईंग सामन्यांना सुरुवात झाली आहे. त्यात पहिला सामना रंगला तो श्रीलंका आणि नामिबिया संघात. आशिया कप जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियात दाखल झालेली श्रीलंका पहिल्याच सामन्यात नामिबियावर आरामात वर्चस्व गाजवेल असं वाटलं होतं. पण लंकेचा हा अंदाज फोल ठरला. श्रीलंकेसाठी सुरुवात चांगली झाली. पण अखेरीस नामिबियाच्या बॅट्समननी श्रीलंकन गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला आणि स्कोअर बोर्डवर 7 बाद 163 धावा उभारल्या.
श्रीलंकेची चांगली सुरुवात
टॉस जिंकून श्रीलंकेनं नामिबियाला बॅटिंगचं आमंत्रण दिलं. पण नामिबियाची सलामीची जोडी 16 धावातच माघारी परतली. दुष्मंता चमीरा, मधुशान, करुणारत्ने आणि हसरंगानं नामिबियावर सुरुवातीला दबाव टाकला. त्याच जाळ्यात नामिबियाची आघाडीची फळी अडकली. त्यामुळे 15 ओव्हर्समध्ये नामिबियाची 6 बाद 95 अशी अवस्था होती. पण शेवटच्या 5 ओव्हर्समध्ये मात्र नामिबियानं टॉप गियर टाकला आणि धावसंख्या दीडशेपार नेऊन ठेवली.
Namibia finish strongly to post a total of 163/7 💥
Will Sri Lanka chase it down?#T20WorldCup | #SLvNAM | 📝 https://t.co/vuNGEcX62U pic.twitter.com/2DhZQbgYni — ICC (@ICC) October 16, 2022
हेही वाचा - T20 World Cup: टी20 वर्ल्ड कपमध्ये 'या' 5 स्पिनर्सची चालणार जादू... सांगा कोण आहे तुमचा फेव्हरेट?
शेवटच्या 5 ओव्हर्समध्ये धुलाई
हाणामारीच्या ओव्हर्समध्ये श्रीलंकन गोलंदाजांची लाईन आणि लेंथ नामिबियाच्या फ्रायलिंक आणि स्मिट या जोडीनं बिघडवून टाकली. या जोडीनं सातव्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली. त्यामुळे नामिबियाला 7 बाद 163 धावांची मजल मारता आली. फ्रायलिंकनं 28 बॉल्समध्ये 44 तर स्मिटनं नाबाद 31 धावा केल्या. या जोडीनं शेवटच्या 5 ओव्हर्समध्ये 68 धावा फटकावल्या.
16 वी ओव्हर - 11
17 वी ओव्हर - 10
18 वी ओव्हर - 16
19 वी ओव्हर - 18
20वी ओव्हर - 13
अशा प्रकारे नामिबियानं शेवटच्या 5 ओव्हर्समध्ये 68 धावांची वसूली केली आणि आपल्या टी20 विश्वचषक मोहिमेला दणक्यात सुरुवात केली. दरम्यान श्रीलंकेकडून मधुशाननं 2 तर हसरंगा, चमिरा, तीक्षणा आणि करुणारत्नेनं प्रत्येकी एक विकेट घेतली.
OUT - Sri Lanka are four down! Frylinck with the bat 🔥 Frylinck with the ball 🔥#SLvNAM | #T20WorldCup
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) October 16, 2022
श्रीलंकेची खराब सुरुवात
नामिबियानं दिलेल्या 164 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रींलंकेची सुरुवात मात्र खराब झाली. पथुन निसंका आणि कुशाल मेंडिस या जोडीला मोठी सलामी देता आली नाही. निसंका 9 तर मेंडिस 6 धावा काढून बाद झाला. तर त्यानंतर आलेला गुणतिलकाही पहिल्याच बॉलवर माघारी परतला. मग बॅटिंगमध्ये कमाल केलेल्या फ्रायलिंकनं आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये धनंजयची विकेट घेऊन श्रीलंकेची अवस्था 4 बाद 40 अशी केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Sports, T20 cricket, T20 world cup 2022