'ना कोई है ना कोई था MS के जैसा', माहीच्या निवृत्तीवर मास्टर-ब्लास्टर व सेहवागही भावुक

'ना कोई है ना कोई था MS के जैसा', माहीच्या निवृत्तीवर मास्टर-ब्लास्टर व सेहवागही भावुक

माहीच्या निवृत्तीच्या बातमीने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे, माहीनंतर सुरेश रैना यानेही निवृत्तीची घोषणा केली आहे

  • Share this:

मुंबई, 15 ऑगस्ट : भारतीय क्रिकेटचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार एम.एस.धोनी याच्या निवृत्तीनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. मैदानात आपल्या बॅटीची कमाल दाखविणारा माही आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळणार नाही याची सर्वांनाच मोठी खंत आहे.

माहीने निवृत्ती जाहीर केल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आणि विरेंद्र सेहवाग यांनाही प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी सचिनने 2011 मध्ये वर्ल्ड कप जिंकल्याची आठवण जागी केली तर सेहवानने ना कोई है ना कोई था MS के जैसा म्हणत माहीला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

स्वातंत्र्यदिनाच्या संध्याकाळी भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून कारकिर्द घडवणारा एम. एस. धोनी (M S Dhoni retires)याने एक मोठी घोषणा केली आहे. T20 आणि एकदिवसीय क्रिकेटमधून त्याने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे. आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेट मधून यापूर्वीच धोनीने निवृत्ती घेतली होती. आता आंतरराष्ट्रीय एकदिवस आणि टी20 क्रिकेटलाही त्याने अल्विदा केलं आहे.

माहीच्या निवृत्तीनंतर सुरेश रैना यानेही निवृत्तीची घोषणा केली आहे. कॅप्टन कूलने आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून कायमची एक्झिट जाहीर केली आहे.  धोनी आंतरराष्ट्रीय T20 मधून निवृत्त झाला असला, तरी IPL मध्ये मात्र तो दिसत राहणार आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: August 15, 2020, 9:39 PM IST

ताज्या बातम्या