LIVE सामन्यात गोलंदाज झाला जादूगार! चेंडूनं नाही तर रुमालानं केली कमाल, VIDEO VIRAL

LIVE सामन्यात गोलंदाज झाला जादूगार! चेंडूनं नाही तर रुमालानं केली कमाल, VIDEO VIRAL

कधी गोलंदाजाला मैदानावर जादू करताना पाहिले आहे? मग पाहा हा VIDEO.

  • Share this:

केप टाऊन, 05 डिसेंबर : क्रिकेटच्या मैदानावर फलंदाज आणि गोलंदाज यांची सेलिब्रेशनची वेगवगेळी स्टाईल असते. काही खेळाडू रागानं तर काही नाचत विकेट मिळाल्यानंतर आनंद व्यक्त करतात. मात्र तुम्ही कधी कोणत्या गोलंदाजाला विकेट घेतल्यानंतर जादू करताना पाहिले आहे का? असा प्रकार नुकत्याच एका सामन्यात घडला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दक्षिण आफ्रिकेत होत असलेल्या Mzansi Super League 2019 या स्पर्धेत एक विस्मयकारक प्रकार घडला. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या एका गोलंदाजानं दिग्गज गोलंदाजाला बाद केले आणि चक्क मैदानावर जादू दाखवण्यास सुरुवात केली.

वाचा-VIDEO : खतरनाक यॉर्कर! स्टम्प हवेत, फलंदाज जमिनीवर; तरी पंचांनी दिला NOT OUT

एमएसएल या स्पर्धेत Paarl Rocks संघाकडून खेळताना गोलंदाज तबरेज शम्सीने प्रतिस्पर्धी संघातील Durban Heatचा आक्रमक फलंदाज डेव्हिड मिलरला बाद केले. ही विकेट घेतल्यानंतर शम्सी चक्क मैदानावर जादूगार होऊन जादू दाखवू लागला. शम्सीनं हातात रुमाल घेत, त्याची एक मोठी काठी तयार केली. ही जादू पाहून खेळाडूंसह सर्व प्रेक्षसही अवाक झाले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

वाचा-VIDEO : पाठीला रुमाल बांधून का धावतायत टीम इंडियाचे खेळाडू? पाहा काय आहे प्रकरण

वाचा-ICCचा नवा गेमचेंजर नियम, पहिल्या टी-20 सामन्यात होणार ट्रायल

जादूनं जिंकले सर्वांचे मन

दरम्यान, तबरेज शम्सीचा संघ पर्ल रॉक्सचा मुझन्सी सुपर लीग 2019च्या 24व्या लीग सामन्यात पराभव झाला. डुब्रान हीटने पार्ले रॉक्सचा 6 गडी राखून पराभव करून लीगमधील आपला तिसरा विजय नोंदविला. त्यामुळे डेव्हिड मिलर बाद झाल्यामुळे संघाचे फारसे नुकसान झाले नाही, परंतु शम्सीच्या या जादूगिरीनं सर्वजण मंत्रमुग्ध झाले. हा व्हिडिओ एमएसएलने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर अपलोड केला आहे. या सामन्यात तबरेज शम्सी सर्वात महागडा गोलंदज ठरला, पण त्याने दोन विकेट्सही घेतल्या. शमीने 4 षटकांमध्ये 37 धावा दिल्या. या सामन्यात मोठी धावसंख्या उभारण्यात आली होती. पार्ल रॉक्सनं प्रथम फलंदाजी करत कॅमरनची 84 धावांची आणि ड्यु प्लेसिसच्या 66 धावांच्या जोरावर संघानं 195 धावा केल्या. डर्बन हीटने अलेक्स हेल्सच्या 97 धावांच्या खेळीवर हे आव्हान पार केले.

Published by: Priyanka Gawde
First published: December 5, 2019, 5:12 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading