Home /News /sport /

'माझी तयारी कशी आहे हे येणारा काळच सांगेल', Hardik Pandya चे सूचक वक्तव्य

'माझी तयारी कशी आहे हे येणारा काळच सांगेल', Hardik Pandya चे सूचक वक्तव्य

Hardik Pandya

Hardik Pandya

हार्दिक पहिल्यांदाच आयपीएलमध्ये कुठल्यातरी संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. दरम्यान त्याने स्वतःसंदर्भात मोठे विधान केले आहे. अष्टपैलू म्हणून आपण खेळण्यासाठी सज्ज असल्याचे पांड्याने (‘My preparations are all about playing as an all-rounder’) म्हटले आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 25 जानेवारी: दुखापतीमुळे सध्या संघाबाहेर असलेल्या हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) अहमदाबाद फ्रेंचायजीने आयपीएल 2022 (IPL 2022) च्या आगामी सीजनसाठी कर्णधार म्हणून नियुक्त केलं आहे. हार्दिक पहिल्यांदाच आयपीएलमध्ये कुठल्यातरी संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. दरम्यान त्याने स्वतःसंदर्भात मोठे विधान केले आहे. अष्टपैलू म्हणून आपण खेळण्यासाठी सज्ज असल्याचे पांड्याने (‘My preparations are all about playing as an all-rounder’) म्हटले आहे. RevSportz शी बोलताना हार्दिक पांड्या म्हणाला की, त्याला टीम इंडियासाठी अष्टपैलू म्हणून खेळायचे आहे. तो म्हणाला, 'मला अष्टपैलू खेळाडूसारखे खेळायचे आहे. तशी माझी तयारी आहे. काही चुकलं तर मी सांगू शकत नाही. पण आता फिट आहे. माझी तयारी कशी आहे हे येणारा काळच सांगेल. असे सूचक वक्तव्य पांड्याने यावेळी केले. यासोबतच त्याने माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीवरही भाष्य केले. त्याने त्याचे कौतुक करत मी त्याच्याकडून खुप काही शिकलो आहे. त्याने मला खूप फ्रीडम दिला. त्याने मला नेहमी प्रोत्साहन दिले आहे. असे सांगत त्याने एक किस्सा सांगितला. तो म्हणाल, मी माझ्या पहिल्या मॅचमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 22 किंवा 24 धावा देण्याचा विचार करत होतो. मला वाटलं की हा माझा पहिला आणि शेवटचा सामना असेल. पण दुसऱ्या ओवरमध्ये माही भाईने मला बोलावले आणि त्यानंतर संपूर्ण चित्रच पालटले. हार्दिक पांड्याने जानेवारी 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. अॅडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या T20 मध्ये त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. वेगवान गोलंदाज म्हणून त्याने 3 षटकात 37 धावा दिल्या आणि 2 बळीही घेतले. भारताने हा सामना 37 धावांनी जिंकला. पांड्याच्या एकूण टी-20 रेकॉर्डवर नजर टाकली तर त्याने 135 डावात 110 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय 147 डावात 2797 धावा केल्या आहेत.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Hardik pandya

    पुढील बातम्या