मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

'My man You legend' वॉर्नरची T20WC फायनलनंतर विल्यमसनसाठी भावनिक पोस्ट

'My man You legend' वॉर्नरची T20WC फायनलनंतर विल्यमसनसाठी भावनिक पोस्ट

David Warner and kane williamson

David Warner and kane williamson

क्रिकेट हा खेळ जगामध्ये जेंटलमॅन गेम म्हणूनही ओळखला जातो. याचा प्रत्यय टी 20 वर्ल्डकपच्या (T20 World Cup ) फायनल मॅचमध्येही आला.

  • Published by:  Dhanshri Otari

दुबई, 16 नोव्हेंबर: क्रिकेट हा खेळ जगामध्ये जेंटलमॅन गेम म्हणूनही ओळखला जातो. याचा प्रत्यय अनेकवेळा आला आहे. नुकतंच पार पडलेल्या टी 20 वर्ल्डकपच्या फायनल मॅचमध्येही आला आहे. मॅच संपल्यानंतर डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि किवी कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) यांनी एकमेकांना मिठी मारली. इतकेच नव्हे तर वॉर्नरने विल्यमसनसाठी भावनिक पोस्टदेखील आपल्या सोशल अकाऊंटवर (David Warner shares a heartfelt picture with Kane Williamson post Australia’s T20 WC triumph) केली आहे. सध्या त्याचा स्क्रिनशॉट व्हायरल होत आहे.

रविवारी झालेल्या टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup Final) फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला (Australia vs New Zealand) धूळ चारत पहिला टी-20 वर्ल्ड कप आपल्या नावावर केला. यामध्ये डेव्हिड वॉर्नरचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 173 रनचे आव्हान दिले होते. मिचेल मार्शच्या (Mitchell Marsh) नाबाद 77 रन आणि वॉर्नरच्या (David Warner) 53 रनच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 7 बॉल शिल्लक असतानाच पार केलं. त्यानंतर क्रिकेट जगतातून वॉर्नरवर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला. मात्र, त्याने आपला आयपीएल सहकारी केन विल्यमसनबद्दल भावनिक पोस्ट शेअर केली.

वॉर्नरने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीला दोघांचा एकमेकांना मिठी मारलेला फोटो शेअर केला. आणि त्याला सुंदर अशी कॅप्शन दिली. 'माझ्या माणसा तु लीजण्ड' म्हणजेच महान खेळाडू आहेस, असे वॉर्नरने कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

Image

वॉर्नरची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये त्याने विल्यमसनचे इन्स्टाग्राम हॅण्डलही टॅग केले आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच विश्वचषक जिंकल्यानंतर वॉर्नरचे अभिनंदन करताना विल्यमसन आणि वॉर्नरने एकमेकांना मिठी मारत शब्बासकी दिलेली. हाच क्षण वॉर्नरने आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट केला आहे. विशेष म्हणजे, विल्यमसन आणि वॉर्नर दोघेही सध्या सनरायझर्स हैदराबाद (SRH) कडून खेळतात.

एका झुंजार योध्याप्रमाणे आपल्या संघाचे पुढे राहून नेतृत्त्व करताना केन विलियम्सनने टी-20 वर्ल्डडकप फायनलमध्ये तगड्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध न्यूझीलंडला मजबूत स्थिती मिळवून दिली होती. विलियम्सने झळकावलेल्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर न्यूझीलंडने 20 षटकांत 4 बाद 172 धावा उभारल्या. विलियम्सनने 48 चेंडूंत 85 धावा काढताना 10 चौकार व 3 षटकार मारले.

First published:

Tags: David warner, New zealand, T20 cricket, T20 world cup