मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /'माझं करियर विराटमुळेच आहे,' कॅप्टन कोहलीचं कौतुक करताना क्रिकेटपटू इमोशनल

'माझं करियर विराटमुळेच आहे,' कॅप्टन कोहलीचं कौतुक करताना क्रिकेटपटू इमोशनल

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला (India vs Australia) त्यांच्याच मायभूमीत लागोपाठ दुसऱ्यांदा टेस्ट सीरिजमध्ये पराभूत करण्याचा ऐतिहासिक विक्रम टीम इंडियाने केला. या सीरिजमध्ये मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) टीम इंडियाचा सगळ्यात यशस्वी बॉलर ठरला.

पुढे वाचा ...

मुंबई, 11 मे : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला (India vs Australia) त्यांच्याच मायभूमीत लागोपाठ दुसऱ्यांदा टेस्ट सीरिजमध्ये पराभूत करण्याचा ऐतिहासिक विक्रम टीम इंडियाने केला. या सीरिजमध्ये मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) टीम इंडियाचा सगळ्यात यशस्वी बॉलर ठरला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमधून सिराजने टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. महत्त्वाच्या खेळाडूंना दुखापत झाल्यामुळे सिराजला संधी मिळाली, या संधीचं त्याने सोनं केलं. 4 टेस्ट मॅचमध्ये त्याने 13 विकेट घेतल्या. या सीरिजमध्ये सिराज टीम इंडियाचा सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू ठरला. यानंतर नुकत्याच स्थगित झालेल्या आयपीएलमध्येही (IPL 2021) सिराज बँगलोरच्या टीमचा हुकमी एक्का होता.

ऑस्ट्रेलियात पोहोचल्यानंतर लगेचच सिराजच्या वडिलांचं निधन झालं, पण तरीही सिराजने घरी न परतता ऑस्ट्रेलियातच थांबण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियात मॅच सुरू व्हायच्या आधी झालेल्या राष्ट्रगीतावेळीही सिराज वडिलांच्या आठवणीने रडला.

मोहम्मद सिराजने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या आठवणी सांगितल्या आहेत. वडिलांच्या निधनानंतर मी हॉटेलमध्ये रडायचो, पण विराटने (Virat Kohli) मला सावरलं आणि पाठिंबा दिला. माझं करियर विराट कोहलीमुळे झालं आहे, कठीण परिस्थितीमध्येही तो माझ्या मागे उभा राहिला, असं सिराजने सांगितलं.

टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सिराज म्हणाला, 'कठीण काळात त्याने मला पाठिंबा दिला. प्रत्येक परिस्थितीमध्ये तो माझ्यासोबत होता. हॉटेल रूममध्ये मी रडत बसलो होतो, विराट भय्या माझ्याजवळ आला आणि त्याने मला घट्ट मिठी मारली. मी तुझ्यासोबत आहे, घाबरू नकोस, असं तो मला म्हणाला.'

'विराटच्या त्या शब्दांनी मला धीर दिला. त्या सीरिजमध्ये विराट फक्त एक मॅच खेळला, पण त्याने मला वारंवार फोन केले आणि मेसेज केले, त्यामुळेच मी चांगली कामगिरी करू शकलो. मागच्या दोन वर्षात बँगलोरकडून खेळताना माझी कामगिरी निराशाजनक झाली, पण तरीही त्याने मला नेहमीच पाठिंबा दिला,' अशी प्रतिक्रिया सिराजने दिली.

'ऑस्ट्रेलियात असताना माझ्या वडिलांचं निधन झालं. मी पूर्णपणे तुटून गेलो होतो, विराट भय्याने मला आधार आणि पाठिंबा दिला. माझं करियर आज जे काही आहे ते त्याच्यामुळेच आहे,' असं सिराज म्हणाला.

First published:

Tags: Cricket, RCB, Team india, Virat kohli