Home /News /sport /

सचिनचा जबरा फॅन, ज्या Police Station चं उद्घाटन केलं तिकडेच पोलिसांनी फटकावलं!

सचिनचा जबरा फॅन, ज्या Police Station चं उद्घाटन केलं तिकडेच पोलिसांनी फटकावलं!

सचिन तेंडुलकरला देव मानणाऱ्या आणि त्याच्या प्रत्येक मॅचला अगदी सातासमुद्रापार जाणाऱ्या जबरा फॅन सुधीर कुमारची (Sachin Tendulkar Fan Sudhir Kumar) बिहार पोलिसांनी धुलाई केली आहे.

    मुझफ्फरपूर, 21 जानेवारी : सचिन तेंडुलकरला देव मानणाऱ्या आणि त्याच्या प्रत्येक मॅचला अगदी सातासमुद्रापार जाणाऱ्या जबरा फॅन सुधीर कुमारची (Sachin Tendulkar Fan Sudhir Kumar) बिहार पोलिसांनी धुलाई केली आहे. मुझफ्फरपूर (Muzaffarpur) जिल्ह्याच्या टाऊन ठाण्यात एका पोलिसाने सुधीर कुमारची पिटाई केली. धक्कादायक गोष्ट म्हणजे याच पोलीस स्टेशनचं सुधीर कुमारने उद्घाटन केलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार सुधीरला एका पोलिसाने शिवी दिली यानंतर त्याच्यावर हात उचलला, पण हाताने न मारता त्याला लाथेने मारलं आणि शिव्या देऊन पोलीस स्टेशनमधून पळवून लावलं. पीडित सुधीरला यामुळे यातना झाल्या आणि त्याने टाऊन डीएसपी रामनरेश पासवान यांच्याकडे याबाबत तक्रार केली. यानंतर डीएसपीनी या प्रकरणाची चौकशी करून कारवाईचं आश्वासन दिलं आहे. गुरूवारी टाऊन ठाणे पोलिसांनी सुधीरचा चुलत भाऊ किशन कुमारला अटक केली होती. संध्याकाळी सुधीर जेव्हा दामोदरपूरमधल्या घरी पोहोचला तेव्हा घरच्यांनी त्याला भावाला अटक केल्याची माहिती दिली. यानंतर सुधीर टाऊन ठाणे पोलीस स्टेशनला गेला. पोलीस स्टेशनला जाऊन सुधीरने भावाला अटक का केली, याबाबत विचारणा केली. सुधीरच्या भावाच्या मित्राने एक जमिन खरेदी केली होती, या जमिनीचा वाद सुरू होता. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली. यानंतर पोलिसांनी सुधीरच्या भावाला अटक केली. सुधीरच्या भावाने मात्र आपल्याला जमिन खरेदीबद्दल काहीही कल्पना नसल्याचं सांगितलं. सुधीर जेव्हा भावाशी बोलत होता तेव्हा एका पोलिसाने त्याच्याशी वाद घालायला सुरूवात केली. यानंतर त्याने सुधीरला शिवी दिली. सुधीरने जेव्हा याचा विरोध केला तेव्हा त्याला पोलिसाने मारपीट केली. यानंतर सुधीर पोलीस स्टेशनबाहेर आला आणि मग डीएसपीकडे तक्रार केली. काही वर्षांपूर्वी जेव्हा हे पोलीस स्टेशन उभारण्यात आलं तेव्हा सेलिब्रिटी म्हणून मला इकडे उद्घाटनासाठी बोलावण्यात आलं. रिबीन काटून मी याचं उद्घाटनही केलं. पण याच पोलीस स्टेशनमध्ये माझी धुलाई करण्यात आली, हे दुर्दैवी आहे. जर माझ्यासोबत असं होत असेल, तर पोलीस सर्वसामान्य जनतेशी कशी वागत असेल हे लक्षात येतं, अशी प्रतिक्रिया सुधीरने दिली.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या